Join us

स्वतःचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला आणि बाळही झाले २९ तारखेलाच, मायलेकीच्या वाढदिवसाची अनोखी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2024 14:44 IST

Mother born on Leap Day gives birth to baby on Leap Day : आई आणि लेक दर ३ वर्षांनी साजरा करणार आपला वाढदिवस...

वाढदिवस किंवा जन्मदिवस ही दरवर्षी ठराविक तारखेला येणारी गोष्ट. पण काही जणांच्या नशीबात हे भाग्य नसतं, याचं कारणही तसंच आहे. लिप इयर म्हणजेच ज्यावर्षी फेब्रुवारी महिन्याला २९ दिवस असतात त्याच दिवशी या व्यक्तींना आपला वाढदिवस साजरा करता येतो. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे दर ३ वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात. नाहीतर हा महिना कायम २८ दिवसांचा असतो. ज्या लोकांचा जन्म लिप इयरच्या वर्षी २९ तारखेला होतो ते कायम ३ वर्षांनीच आपला वाढदिवस त्या तारखेला साजरा करु शकतात. घरातील एका व्यक्तीचा वाढदिवस अशाप्रकारे लिप इयरला असणं ठिक आहे (Mother born on Leap Day gives birth to baby on Leap Day). 

पण एका आईचा स्वत:चा वाढदिवस २९ फेब्रुवारीला असतो. इतकेच काय पण तिने नुकताच मुलीला जन्म दिला आणि ती मुलगीही २९ फेब्रुवारीला जन्माला आली. त्यामुळे आता या दोघींचा वाढदिवस ३ वर्षांनी एकदा साजरा केला जाणार आहे. अमेरीकेमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव डॉ. काई सन असून तिने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे नाव क्लो ठेवण्यात आले आहे. डॉ. सन हिचे हे तिसरे अपत्य असून तिला या बाळाच्या जन्माची अपेक्षित तारीख २६ फेब्रुवारी देण्यात  आली होती. पण या बाळाने २९ फेब्रुवारीला जगात प्रवेश केला. 

याआधी मागच्याच वर्षी आपले मिसकॅरेज झाल्यानंतर आता आपण मुलीला जन्म दिल्याने तिच्या जन्माचा दिवस आणि मुलगी दोन्ही आपल्यासाठी स्पेशल आहेत असे डॉ सन म्हणाल्या. आई आणि मुलीचा वाढदिवस एकाच दिवशी असणारे फारच कमी लोक असतील पण त्यातही लीप इयरला २९ फेब्रुवारीला एकत्र वाढदिवस असणारी मायलेकीची अशी जोडी क्वचितच असेल. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया