Lokmat Sakhi >Social Viral > 'या' ३ गोष्टींचं मिश्रण करून घरात शिंपडा, कानाजवळ येऊन घोंगावणार नाही एकही डास...

'या' ३ गोष्टींचं मिश्रण करून घरात शिंपडा, कानाजवळ येऊन घोंगावणार नाही एकही डास...

Home Made Mosquito Repelant Spray: काही नॅचरल उपाय करूनही तुम्ही डास घरातून पळवून लावू शकता. डास पळवण्यासाठी अशाच एका मिश्रणाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:55 IST2025-06-12T10:54:15+5:302025-06-12T10:55:02+5:30

Home Made Mosquito Repelant Spray: काही नॅचरल उपाय करूनही तुम्ही डास घरातून पळवून लावू शकता. डास पळवण्यासाठी अशाच एका मिश्रणाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mosquito repelant spray to remove insect and mosquitos completely | 'या' ३ गोष्टींचं मिश्रण करून घरात शिंपडा, कानाजवळ येऊन घोंगावणार नाही एकही डास...

'या' ३ गोष्टींचं मिश्रण करून घरात शिंपडा, कानाजवळ येऊन घोंगावणार नाही एकही डास...

Home Made Mosquito Repelant Spray: वातावरण दमट झालं किंवा पावसाला सुरूवात झाली की, डासांची समस्या घराघरांमध्ये जाणवते. डासांमुळे गंभीर आजारांचा धोका तर वाढतोच, सोबतच झोपमोडही होते. डास चावल्यानं त्वचेवर पुरळही येते. अशात डास पळवण्यासाठी वेगवेगळे कॉइल्स आणि केमिकल्स वापरले जातात. या गोष्टी सुद्धा आरोग्याचं नुकसान करतात. अशात काही नॅचरल उपाय करूनही तुम्ही डास घरातून पळवून लावू शकता. डास पळवण्यासाठी अशाच एका मिश्रणाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कसं तयार कराल मिश्रण?

डास आणि माश्या पळवून लावण्यासाठी कडूलिंबाचं तेल घ्या. हे तेल डास पळवून लावण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. त्याशिवाय लिंबाचा रस ज्याती सिट्रिस अॅसिड कीटकांना पळवून लावतं. तसेच कापूरही डास आणि माश्या पळवून लावतो.
या गोष्टींचं खास मिश्रण तयार करण्यासाठी एक स्प्रे बॉटल घ्या. त्यात २ चमचे कडूलिंबाचं तेल टाका. वरून एक चमचा लिंबाचा रस टाका आणि नंतर कापराच्या दोन वड्या बारीक करून त्यात मिक्स करा. शेवटी बॉटलमध्ये पाणी टाका. बॉटल चांगली हलवा, जेणेकरून यातील मिश्रण चांगलं मिक्स होईल. 

घरातील डास पळवून लावण्याचा स्प्रे तयार आहे. याचा वापरही खूप सोपा आहे. हे मिश्रण घरातील कानाकोपऱ्यांमध्ये स्प्रे करा. ज्या ठिकाणी डास येतात तिथे स्प्रे करा. खिडक्या, दारं, पडदे, बेड खाली, सोफ्या खाली स्प्रे करा. जेव्हाही याचा वापर कराल तेव्हा बॉटल एकदा हलवून घ्याल.

डास आणि माश्यांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी हे मिश्रण खूप फायदेशीर ठरतं. बाजारातील विषारी तत्व असलेल्या गोष्टींपेक्षा हा नॅचरल स्प्रे अधिक चांगला ठरेल. कारण याचे काही साइड इफेक्ट्सही नाहीत. 

Web Title: Mosquito repelant spray to remove insect and mosquitos completely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.