पावसाळा जेवढा हवाहवासा वाटतो, तेवढाच तो कधी कधी खूप कंटाळवाणाही होतो. घराच्या बाहेर जाऊन पावसाचे सौंदर्य पाहायला छान वाटते. पण घराच्या आसपास जी चिखल, माती, कचकच झालेली असते त्यामुळे मग कधी कधी पावसाळा असह्य व्हायला लागताे. अशातच ज्या ठिकाणी सलग काही दिवस खूप जास्त पाऊस पडतो, किंवा आभाळ आलेलं असतं अशा वातावरणात कपडे वाळण्याचीही पंचाईत असते. रोजचे कपडे धुवून टाकल्याशिवाय तर पर्याय नसतो. पण कपडे वाळण्यासाठी पुरेसं ऊन नसल्याने ते वाळायला उशीर लागतो आणि मग त्यांच्यातून कुबट वास येऊ लागतो. असे कपडे धुतलेले असले तरी स्वच्छ वाटत नाहीत (how to remove bad smell or odour from clothes in rainy days?). म्हणूनच कपड्यांची दुर्गंधी घालविण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतो ते पाहूया..(imple tips and tricks to keep clothes odour free in monsoon)
पावसाळ्यात कपड्यांना येणारी दुर्गंधी कशी कमी करावी?
१. कपडे पुर्णपणे वाळल्याशिवाय अजिबात त्यांच्या घड्या घालायच्या नाहीत. कारण बऱ्याचदा असं होतं की कपड्यांमध्ये थोडासा ओलसरपणा असला तरीही काही जणी त्यांच्या घड्या घालून टाकतात. कारण पुढचे कपडे कुठे वाळत घालावे असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. पण यामुळेच कपड्यांची दुर्गंधी वाढत जाते.
साडीचा काठ ब्लाऊजमध्ये 'या' पद्धतीने वापरा! ब्लाऊज दिसेल हटके, स्टायलिश- पाहा ९ आयडिया
२. जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा घरातल्या एखाद्या खोलीमध्ये कपडे वाळत घाला. कपडे वाळत असताना त्या खोलीचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवा आणि मोठा पंखा लावा. बंदिस्त, हवा नसलेल्या खोलीत कपडे वाळत घातल्यानेही त्यांना कुबट वास येऊ लागतो.
३. धुतलेल्या कपड्यांना छान सुगंध येण्यासाठी बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर कपड्यांचं क्लिंझर मिळतं. ते विकत आणून त्याचा वापर करायलाही हरकत नाही. त्याच्या स्ट्राँग सुगंधामुळे कपड्यांची दुर्गंधी कमी होते.
फरशांच्या गॅपमधला काळेपणा खूप वाढला? १ उपाय- जास्त न घासताही ५ मिनिटांत डाग गायब
४. पावसाळ्याच्या दिवसांत कपाटात किंवा कपडे ठेवण्याच्या बास्केटमध्ये कापूर, डांबर गोळ्या, उदबत्ती किंवा धूपची रिकामी पाकिटं अशा सुगंधी वस्तू ठेवा. त्यांच्या सुगंधामुळेही कपाटातील कपड्यांचा कुबट वास जाऊन ते छान फ्रेश वाटतील.