Join us

मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:25 IST

पाऊस पडत असला तरी प्रचंड गरम होत आहे. एसीची थंड हवा दिलासा देते.

एअर कंडिशनरचा (AC) वापर हा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर केला जातो. उष्णता वाढल्याने हल्ली अनेकांच्या घरी एसी असतोच. पाऊस पडत असला तरी प्रचंड गरम होत आहे. एसीची थंड हवा दिलासा देते. मात्र जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा एसी सुरू ठेवावा का?, पावसाचा एसीला फटका बसतो का? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. पावसाळ्यात विजेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे एसी आणि तुमची सुरक्षितता या दोन्हींवर परिणाम होऊ शकतो.

कंप्रेसर खराब होण्याची भीती

पावसाळ्यात विजांचा कडकडाट झाला आणि जोरात पाऊस पडला की अचानक वीज खंडित होण्याची समस्या सामान्य आहे. अशा परिस्थितीत अचानक लाईट गेल्याने एसीचा कंप्रेसर खराब होऊ शकतो, ज्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागू शकतात. म्हणूनच मुसळधार पाऊस आणि वादळात एसी वापर करणं टाळावं.

 

एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका

व्होल्टेज फ्लक्चुएशन

जोरात वारा वाहत असल्यास आणि पावसामुळे व्होल्टेजमध्ये फ्लक्चुएशन दिसून येतं, ज्यामुळे एसी सर्किटमध्ये मोठी समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून अशा हवामानात एसी वापरणं टाळावं. तसेच तुमच्या एसीचं ग्राउंडिंग योग्य नसेल, तर ते तुमच्या एअर कंडिशनरला नुकसान पोहोचवू शकतं.

कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी? ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर...

पार्ट्समध्ये जातं पाणी

कृपया लक्षात ठेवा , इन्व्हर्टर एसी देखील खूप खराब हवामानात सुरक्षित नाहीत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एसी वापरत असाल तर त्यासोबत चांगला स्टॅबिलायझर वापरा, जेणेकरून व्होल्टेज फ्लक्चुएशन टाळता येतील. जर मुसळधार पाऊस पडत असेल आणि एसीचे बाहेरील युनिट उघड्यावर बसवले असेल, तर एअर कंडिशनरच्या काही अंतर्गत भागांमध्येही पाणी जाऊ शकतं.