Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > आई, घटस्फोट म्हणजे काय? असं मुलीने विचारल्यावर हार्टअटॅक येणंच बाकी होतं!- लारा दत्ता सांगतेय..

आई, घटस्फोट म्हणजे काय? असं मुलीने विचारल्यावर हार्टअटॅक येणंच बाकी होतं!- लारा दत्ता सांगतेय..

४ वर्षाच्या मुलीचे शब्द ऐकून लारा दत्ताला बसला होता धक्का, खुलासा केल्यावर समजले की....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 17:32 IST2021-12-01T17:28:03+5:302021-12-01T17:32:48+5:30

४ वर्षाच्या मुलीचे शब्द ऐकून लारा दत्ताला बसला होता धक्का, खुलासा केल्यावर समजले की....

Mom, what is a divorce? When a girl asks that, she has to have a heart attack! - Lara Dutta says. | आई, घटस्फोट म्हणजे काय? असं मुलीने विचारल्यावर हार्टअटॅक येणंच बाकी होतं!- लारा दत्ता सांगतेय..

आई, घटस्फोट म्हणजे काय? असं मुलीने विचारल्यावर हार्टअटॅक येणंच बाकी होतं!- लारा दत्ता सांगतेय..

लहान मुलं कधी काय बोलतील आणि आपल्याला चकीत करतील सांगता येत नाही. हे लहानगे अनेकदा इतके हुशार असतात की आपल्या बोलण्यातील, वागण्यातील प्रत्यक गोष्ट लक्षात ठेवतात आणि अचानक कधीतरी त्याबद्दल बोलतात. त्यांचे बोलणे ऐकून मग आपणही अक्षरश: चक्रावून जातो. ही गोष्ट सामान्यांच्याच बाबतीत घडते असे नाही तर अभिनेत्रींच्या बाबतीतही हे घडते. अभिनेत्री लारा दत्ता हिने नुकताच तिचा याबाबतचा अनुभव शेअर केला. लाराची ‘हिक्कप्स अँड हुक्कप्स’ ही नवीन वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली, प्रेक्षकांची या वेबसिरीजला चांगली पसंती मिळत आहे. यानिमित्ताने आयोजित केलेल्या एका मुलाखतीत लारा बोलत होती. 

(Image : Google)
(Image : Google)

लारा दत्ताचे प्रसिद्ध टेनिसपटू महेश भूपती याच्याशी २०११ मध्ये लग्न झाले होते. तर २०१२ मध्ये तिने सायराला जन्म दिला. लारा म्हणते, महेशला फ्रेंडस वेबसिरीज खूप आवडायची त्यामुळे सायराही कमी वयात ही वेबसिरीज बघायला लागली. एकदा असेच खेळता खेळता सायरा माझ्याजवळ आली आणि म्हणाली. “मम्मा मी इथे राहते म्हणजे हे माझे घर आहे, ते तुझे घर आहे आणि मी घटस्फोटीत आहे.” हे ऐकून लाराने तिला विचारले, “हे तु काय बोलतीयेस आणि तुला हे कोणी सांगितले?” तेव्हा ती म्हणाली, जेव्हा दोन लोकांचे एकमेकांशी पटत नाही तेव्हा ते वेगळे राहायला लागतात याचाच अर्थ घटस्फोट. तेव्हा ती पाच वर्षाची व्हायची होती. तिच्या तोंडून हे ऐकून तुला हे कोणी सांगितले असे मी तिला विचारले. 

(Image : Google)
(Image : Google)

तेव्हा सायरा म्हणाली, डॅडीने सांगितले. यानंतर लाराने तडक जाऊन महेशला फोन लावला आणि सायराला घटस्फोटाबद्दल सांगितल्याचा जाब विचारला. त्यावेळी महेश हसायला लागला आणि म्हणाला, आम्ही फ्रेंडस पाहात होतो आणि त्यात रॉसने तीन लग्न का केली याबाबत सायराला माहिती हवी होती. मग तु तिला घटस्फोटाचा अर्थ सांगितलास, आपण त्या प्रकारचे पालक आहोत का असे लाराने महेशला काहीशा रागानेच विचारले असे लारा म्हणाली. ‘हिक्कप्स अँड हुक्कप्स’ मध्ये लाराने वसुधाची या एका तरुण मुलीच्या आईची भूमिका करत आहे. त्या अनुषंगाने तिला प्रश्न विचारण्यात आल्यावर तिने आपला अनुभव शेअर केला. 

 

 

 

Web Title: Mom, what is a divorce? When a girl asks that, she has to have a heart attack! - Lara Dutta says.