Lokmat Sakhi >Social Viral > अंबानींकडच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या जांभळ्या साडीचीच चर्चा, ती साडी इतकी खास आहे कारण...

अंबानींकडच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या जांभळ्या साडीचीच चर्चा, ती साडी इतकी खास आहे कारण...

Mom-to-be Deepika Padukone stuns in purple saree as she heads to Anant Ambani and Radhika Merchant's sangeet ceremony : साडीची किंमत किती आणि ती बनवण्यासाठी किती वेळ लागला हे ऐकून सगळेच आश्चर्यचकीत होत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 08:37 PM2024-07-09T20:37:11+5:302024-07-09T20:50:03+5:30

Mom-to-be Deepika Padukone stuns in purple saree as she heads to Anant Ambani and Radhika Merchant's sangeet ceremony : साडीची किंमत किती आणि ती बनवण्यासाठी किती वेळ लागला हे ऐकून सगळेच आश्चर्यचकीत होत आहेत.

Mom-to-be Deepika Padukone stuns in purple saree as she heads to Anant Ambani and Radhika Merchant's sangeet ceremony Deepika Padukone Shines at Ambani’s Sangeet | अंबानींकडच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या जांभळ्या साडीचीच चर्चा, ती साडी इतकी खास आहे कारण...

अंबानींकडच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या जांभळ्या साडीचीच चर्चा, ती साडी इतकी खास आहे कारण...

बॉलिवूडमधील नुकतीच 'मॉम टू बी' होणारी प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही सध्या फार चर्चेत आहे. ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटातील तिची भूमिका व लवकरच ती आई बनणार आहे, या दोन गोष्टींमुळे ती सध्या बरीच चर्चेत आहे. दीपिकाने नुकतीच उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला उपस्थितीत लावली. या खास सोहळ्याप्रसंगी (Anant Ambani-Radhika Merchant's Sangeet ceremony) दीपिकाने नेसलेल्या साडीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर फारच व्हायरल होत आहेत. अनंत आणि राधिक मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला दीपिकाने जांभळ्या रंगाची रत्नजडित साडी नेसली होती. या सोहळ्यासाठी उद्योग जगतातील नामवंत व्यक्ती तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते. मात्र सर्वांच्या नजरा दीपिकावरच खिळल्या होत्या. तिच्या या साडीची सोशल मिडियावरही चर्चा होताना दिसत आहे. कित्येक नेटकऱ्यांना ही जांभळ्या रंगाची साडी पाहून ‘हम आपके है कौन’ मधील माधुरी दीक्षितचा लूक आठवला. परंतु  या साडीची किंमत किती आणि ती बनवण्यासाठी किती वेळ लागला हे ऐकून सगळेच आश्चर्यचकीत होत आहेत(Deepika Padukone flaunts baby bump in purple saree at Anant Ambani-Radhika Merchant's Sangeet ceremony).

 अतिशय ग्रेसफुली दीपिकाने ही साडी कॅरी केली होती. एवढंच नव्हे तर त्यासोबतचा तिचा लूकही सिंपल पण एलीगंट असा होता. जांभळ्या रंगाच्या साडीत दीपिका खूपच सुंदर दिसत होती. कॅमेऱ्यासमोर सुंदर साडीत फोटो काढताना तिने बेबी बंपही फ्लाँट केले असल्याचे दिसत आहे. दीपिका पदुकोणची सुंदर जांभळ्या रंगाची साडी इतकी खास का आहे हे जाणून घेऊया(Deepika Padukone Shines at Ambani’s Sangeet).

दीपिकाच्या या जांभळ्या रंगाच्या साडीला सेलिब्रिटी स्टायलिस्ट शालिना नैथानी आणि अंजली चौहान यांनी स्टाइल केली आहे. ही साडी करण तौरानीने खास दीपिकासाठी बनवली आहे. दीपिकाची सुंदर जांभळी साडी तौरानीच्या वॉर्डरोबमधील आहे. या साडीचे फॅब्रिक ऑर्गेन्झा आणि जेनी सिल्क पद्धतीचे आहे. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर हाताने भरतकाम केले आहे. हि साडी तयार करण्यासाठी सुमारे ३,४०० तास लागले. या साडीवर मोती, जरी, तार यांची अनोखी गुंफण केली आहे, त्यामुळे साडीच्या सौंदर्यात एक वेगळीच भर पडली आहे. एवढेच नाही तर या साडीची किंमत हजारो नाही तर लाखो रुपयांत आहे. दीपिकाने नेसलेल्या या जांभळ्या साडीची किंमत १ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे. तोरानी लेबलच्या या साडील हुकूम की 'रानी साडी' सेट म्हटले जाते. हे त्यांच्या काऊचर कलेक्शन लीला मधील आहे. या साडीवर घातलेल्या मॅचिंग ब्लाऊजची किंमत तब्बल ४६,५०० रुपये इतकी आहे.

दीपिकाची साडीच इतकी सुंदर होती, परंतु या साडी सोबतच तिने या साडीला साजेस असं कमालीचं ज्वेलरी कॉम्बिनेशन केलेलं दिसत आहे. दीपिकाने या साडीवर डीप नेकलाइन, हाफ - लेन्थ स्लीव्हज आणि क्रॉप्ड हेमचा मॅचिंग ब्लाऊज घातला होता. दागिन्यांमध्ये तिने मोत्यांनी बनवलेला चोकर नेकलेस, मॅचिंग कानातले आणि अंगठी घालून आपल्या लूकमध्ये चार चांद लावले. 

ही साडी नेसून आणखीन ग्लॅमरस लूक येण्यासाठी दीपिकाने त्यावर सूट होईल असा मेकअप देखील केला आहे. दीपिकाने विंग्स आयलायनर, स्मोकी आईज, न्यूड शेडची हलकासा फेड रंग असणारी लिपस्टिक लावली आहे. यासोबतच मस्करा, गालावर टिन्टेट रुज लावून तिने आपला लूक पूर्ण केला आहे. केसांचा छोटासा बन बांधून तिने आपला लूक अधिकच आकर्षित केला आहे.

Web Title: Mom-to-be Deepika Padukone stuns in purple saree as she heads to Anant Ambani and Radhika Merchant's sangeet ceremony Deepika Padukone Shines at Ambani’s Sangeet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.