How to Get Rid of Cockroaches: घराची नियमित साफसफाई करणे खूप आवश्यक आहे. स्वच्छता कमी झाली की घरात कीडे-माकोडे होतात आणि त्यातही कॉकरोच म्हणजेच झुरळं सर्वात जास्त त्रास देणारे असतात. एकदा घरात झुरळे आली की त्यांना बाहेर काढणं अवघड होतं. ते किचनमध्ये, भांड्यांवर, खाण्याच्या वस्तूंवर फिरताना दिसतात, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून घरातून झुरळं बाहेर काढणं महत्त्वाचं आहे. बाजारातील अनेक स्प्रे किंवा औषधं वापरूनही कधी-कधी जास्त फरक पडत नाही. अशा वेळी काही घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात.
1) साखर आणि बेकिंग सोडा
साखर आणि बेकिंग सोडा एकत्र करून बनवलेले मिश्रण झुरळं संपवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. हा उपाय करण्यासाठी 1 चमचा साखर, 1 चमचा बेकिंग सोडा हे दोन्ही एकत्र मिसळा. आता हे मिश्रण त्या ठिकाणी ठेवा जिथे झुरळं जास्त दिसतात. यामध्ये साखर झुरळांना आकर्षित करते आणि बेकिंग सोडा त्यांना मारतो.
2) केरोसिन म्हणजेच घासलेट
घासलेट झुरळांना दूर ठेवण्यासाठी प्रभावी आहे. याचा वापर करण्यासाठी थोडे केरोसिन + थोडे पाणी हे मिश्रण झुरळं जिथे जास्त दिसतात त्या ठिकाणी शिंपडा. झुरळांना हा वास अजिबात सहन होत नाही आणि ते पळून जातात.
3) लिंबू आणि संत्र्याचा रस
लिंबू आणि संत्र्यातील सिट्रिक अॅसिड झुरळांना दूर ठेवतं. याचा वापर करण्यासाठी घराच्या कोपऱ्यात लिंबू किंवा संत्र्याचा रस शिंपडा किंवा लिंबाच्या सुक्या साली त्या ठिकाणी ठेवा. यामुळे झुरळे त्या भागापासून दूर राहतात.
