Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिस थायलंडचा खोटा दात स्टेजवरच पडला सर्वांदेखत, तिने चटकन काय केलं पाहा.. व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2026 13:42 IST

Miss Grand Thailand 2026: स्वत:ची ओळख करून देताना स्टेजवरच मॉडेल कमोलवन चानागो (Kamolwan Chanago) हिचा नकली दात तुटला आणि मग तिने जे काही केलं ते पाहून तिचं जगभर कौतूक होत आहे...

ठळक मुद्देया प्रसंगानंतर कमोलवनने मात्र कित्येकांची मने जिंकली आहेत, हे नक्की.. 

सौंदर्य स्पर्धा कोणत्याही देशातली असली तरी तिची चर्चा अख्ख्या फॅशन जगतात होत असते. या क्षेत्रातले कित्येक लोक त्या स्पर्धेकडे लक्ष ठेवून असतात. अशावेळी त्या स्पर्धेमध्ये ज्या कोणी मॉडेल्स उतरतात त्यांच्या मनावर प्रेक्षकांचं खूप मोठं ओझं असतं. प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे आपल्याकडे पाहणाऱ्या असंख्य नजरा झेलत त्यांना आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करायचा असतो. अशावेळी झालेली एक छोटीशी गोष्टही त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम करणारी ठरते. अशामध्येच चक्क Miss Grand Thailand 2026 ही स्पर्धा सुरू असताना माॅडेल कमोलवन चानागो (Kamolwan Chanago) हिचा नकली दात तुटला. त्यावेळी ती स्वत:चीच माहिती स्टेजवरून सगळ्यांना देत होती. खरंतर हा प्रसंग तिच्यासाठी खूप भांबावून टाकणारा होता. पण तिने ज्या पद्धतीने वेळ मारून नेली, ते पाहून जज लोकांनी तिचं मनापासून कौतूक केलं...

 

बहुसंख्य लोकांच्या बाबतीत असं होतं की जेव्हा त्यांच्या बाबतीत अशी एखादी घटना घडते तेव्हा ते खूप जास्त गोंधळून जातात. काय करावं हे सूचत नाही आणि त्यांच्या मनातला हा सगळा गोंधळ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो.

मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यात ‘पॉप्युलर’ व्हायचंय? करा फक्त ८ गोष्टी- तुम्हीच व्हाल सगळ्यांच्या फेवरिट

खूपच कमी लोकांना अशा परिस्थितीत संयमित राहाता येतं. मॉडेल कमोलवन चानागो ही त्यापैकीच एक. एवढ्या मोठ्या स्पर्धेत ती स्वत:विषयीची माहिती सांगत होती. तेवढ्यात तिचे नकली दात निखळून आले. असं होताच कमोलवनचं बोलणं अडखळलं. काय झालंय हे क्षणातच तिच्या लक्षात आलं.

 

तिने काही सेकंदासाठी मागे वळून पाहिलं आणि दात पुन्हा तोंडात बसवले. त्यानंतर पुन्हा एकदा ती आधीच्याच आत्मविश्वासाने रॅम्पवॉक करू लागली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

कुंडीतल्या मातीची गुणवत्ताही महत्त्वाची! नुसतंच खतपाणी घालून उपयोग नाही-पाहा मातीचा कस कसा वाढवायचा..

तिने दाखवलेला कॉन्फिडन्स आणि आलेली वेळ यशस्वीपणे निभावून नेण्याची तिची क्षमता पाहूनच नेटिझन्स तिचे भरभरून कौतूक करत आहेत. ही स्पर्धा कोण जिंकेल हे सांगता येत नसली तरी या प्रसंगानंतर कमोलवनने मात्र कित्येकांची मने जिंकली आहेत, हे नक्की.. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Miss Thailand's fake tooth fell on stage; see her reaction.

Web Summary : Miss Grand Thailand contestant's fake tooth fell off during the competition. Despite the embarrassing moment, she quickly recovered, replaced the tooth, and continued confidently, earning praise for her composure.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाथायलंड