सचिन तेंडुलकरने लेकाच्या सेवन स्टार लग्नात काय मेन्यू ठेवला होता कळलं ना तुम्हाला? सचिन मुळात खवय्या, त्यात लेकाचं लग्न, घरचं पहिलं कार्य, जगभरातले बडेबडे लोक लग्नाला आले आणि सचिनने पंगतीत जेवण वाढलं, चांदीच्या ताटात पदार्थ वाढण्यात आले. बुफे नाही की पनीर नाही दाल मखनी नाही. नान, तंदूर रोटी, पनीरच्या भाज्या, छोले भटुरे, रबडी, चाट चे स्टॉल, साऊथ इंडियन स्टॉल लावणं त्याला का जमलं नसतं? पण त्यानं वाढलं काय ता साधं वरण आणि भात, पुरणपोळी, बटाटेवडा, पुणेरी मिसळ, कोथिंबीर वडी, भरलं वांगं, श्रीखंड, खमंग थालिपीठ, साबुदाणा वडे, उकडीचे मोदक, डाळिंब्याची उसळ.. ग्लोबल झाला पण तो त्याचं मराठीपण विसरला नाही. आता आठवा, आपल्याकडची आताची लग्न, वाटतं का हो जेवावंसं हातात ताटं धरुन उभ्या उभ्या?
आजच्या पिढीला आवडतात म्हणून नूडल्स, मंच्युरियन, चीज बॉल ते चिनी पंजाबी साऊथ इंडियन पदार्थ आणि पनीरचा मारा असतो हल्ली लग्नात.. नाही म्हणायला मग या सगळ्या परप्रांतीय पदार्थांच्या गर्दीत विहिण पंगतीला हळूच पुरणपोळी डोकावते. पण बाकी लग्नाच्या पदार्थात आता मराठीपण उरलं तरी आहे का? आपलं ते सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं.. ही वृत्ती सगळीकडेच वाढली आहे. लग्नाची पंगतही त्याला अपवाद नाही. मुळात आपल्याकडे आता पंगती उरल्याच नाहीत. बुफेच्या नावाखाली खेडोपाडीही आता लग्नात अगदीच टिपिकल पदार्थ दिसतात. मिक्स व्हेजच्या नावाखाली, पनीरच्या क्रेझपोटी तेच तेच पदार्थ मेन्यूत दिसतात.हॉटेलमध्ये गेल्यावरही तेच खायचं आणि लग्नात गेल्यावरही तेच खायचं.. असं आपलं झालं आहे.मुळात लग्नात सर्वात जास्त लक्षात राहतं ते जेवण. त्यातली चव, सोबतीने खाल्लेले दोन घास जास्तीचे. प्रेमाचे पदार्थ, आग्रहानं केलेला पाहुणचार. त्यातले आपले मराठी पदार्थ, पूर्वी उसळ बुंदी वांग्या बटाट्याचा रस्सा, कढीभात, शिरा हे पदार्थ साधेच असत पण त्याला किती चव होती. लग्नाच्या पंगती अजून आठवतात जुन्या लोकांना.. तुम्हाला आठवतात का असे काही खास पंगतीचे पदार्थ.. की आहेच पनीरचे लालेलाल लगदे?
Web Summary : Sachin Tendulkar's son's wedding featured traditional Marathi cuisine, bucking modern trends of international dishes. The article contrasts this with typical wedding buffets, lamenting the decline of authentic Marathi flavors and the preference for commonplace hotel-style menus.
Web Summary : सचिन तेंदुलकर के बेटे की शादी में पारंपरिक मराठी व्यंजन थे, जो अंतरराष्ट्रीय व्यंजनों के आधुनिक रुझानों के विपरीत थे। लेख विशिष्ट विवाह बुफे के साथ इसकी तुलना करता है, प्रामाणिक मराठी स्वादों में गिरावट और सामान्य होटल-शैली मेनू के लिए प्राथमिकता पर शोक व्यक्त करता है।