Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > मासिक पाळीचे रक्त चेहऱ्याला लावण्याचा व्हायरल ट्रेंड, सुंदर होण्याच्या नादात भलताच प्रकार...

मासिक पाळीचे रक्त चेहऱ्याला लावण्याचा व्हायरल ट्रेंड, सुंदर होण्याच्या नादात भलताच प्रकार...

menstrual masking skincare trend : period blood facial trend : period blood face mask : पीरियड ब्लड स्किनसाठी फायदेशीर आहे की धोकादायक? हा आगळावेगळा ट्रेंड नेमका काय आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2025 17:36 IST2025-11-22T17:22:43+5:302025-11-22T17:36:34+5:30

menstrual masking skincare trend : period blood facial trend : period blood face mask : पीरियड ब्लड स्किनसाठी फायदेशीर आहे की धोकादायक? हा आगळावेगळा ट्रेंड नेमका काय आहे...

menstrual masking skincare trend period blood facial trend period blood face mask | मासिक पाळीचे रक्त चेहऱ्याला लावण्याचा व्हायरल ट्रेंड, सुंदर होण्याच्या नादात भलताच प्रकार...

मासिक पाळीचे रक्त चेहऱ्याला लावण्याचा व्हायरल ट्रेंड, सुंदर होण्याच्या नादात भलताच प्रकार...

दर महिन्याला येणारी मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील अविभाज्या भागच आहे. महिन्यांतील त्या पाच दिवशी होणाऱ्या वेदना, त्रास बरेचदा कित्येकजणींना नकोसा वाटू लागतो. परंतु, या नैसर्गिक प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजकाल सोशल मिडीयाने पूर्णपणे बदलला आहे. आजकाल सोशल मिडीयावर अनेक चित्रविचित्र आणि धक्कादायक ब्यूटी ट्रेंड्स पाहायला मिळतात. त्यातला सर्वात चर्चेत असलेला एक नवा ट्रेंड म्हणजे महिलांनी मासिक पाळीच्या रक्ताचा फेसमास्क (menstrual masking skincare trend) म्हणून वापर करणे. काही महिलांच्या मते पीरियड ब्लडमध्ये त्वचेसाठी पोषक घटक असल्याने ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार, तरुण आणि पिंपल-फ्री होते(period blood face mask).

मासिक पाळीच्या रक्तात असलेले पोषणद्रव्ये, स्टेम सेल्स आणि व्हिटॅमिन्स त्वचेला 'नैसर्गिक तेज' देतात. परंतु हा ट्रेंड वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित आहे का? खरोखर पीरियड ब्लड स्किनसाठी फायदेशीर आहे की धोकादायक? हा आगळावेगळा ट्रेंड नेमका काय  आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामागील वैज्ञानिक सत्य आणि त्यामुळे होणारे संभाव्य धोके काय आहेत, हे जाणून घेणे प्रत्येक महिलेसाठी आवश्यक आहे.

मासिक पाळीतील रक्त फेसमास्क म्हणून वापरण्याचा नवा ट्रेंड आहे तरी काय ?

मासिक पाळीतील रक्त चेहऱ्यावरील त्वचेवर मास्कप्रमाणे लावून विशिष्ट वेळेनंतर धुऊन टाकणे, याला 'मेन्स्ट्रुअल मास्किंग' (Menstrual Masking) असे म्हणतात. अनेक सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्स याला 'होममेड व्हॅम्पायर फेशियल' किंवा 'नैसर्गिक उपचार' म्हणून व्हायरल करत आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की मासिक पाळीतील रक्त हे पोषणद्रव्ये झिंक, लोह आणि अगदी स्टेम सेल्स यांसारखे भरपूर पोषक गुणधर्म त्यात असतात. हे रक्त त्वचेवर लावल्यास ते कोलेजन वाढवते, मुरुमे कमी करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते.

आवडते पदार्थ खाऊनही वजन राहील नियंत्रणात! 'थ्री बाईट रुल' ची कमाल - मन मारुन डाएटिंग करण्याची गरजच नाही...

हा ट्रेंड लोकप्रिय असला तरी, वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचे कोणतेही स्पष्ट फायदे सिद्ध झालेले नाहीत.मासिक पाळीच्या रक्तात पोषक घटक असले तरी, रक्त जमा झाल्यानंतर आणि शरीराबाहेर आल्यावर त्वचेला थेट फायदा होईल, यासाठी पुरेसा वैज्ञानिक पुरावा नाही. त्वचेद्वारे हे घटक शोषले जाण्याची प्रक्रिया अत्यंत मर्यादित असते.

मॉडर्न पॅरेंटिंगचा नवा दावा, म्हणे डायपर बदलण्यापूर्वी बाळाची परवानगी घ्या, कन्सेंटचा करा विचार कारण...

ट्रेंड असला तरी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच... 

मासिक पाळीचे रक्त निर्जंतुक केलेले नसते, त्यामुळे ते चेहऱ्यावर लावणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. मासिक पाळीचे रक्त हे योनीमार्गातून बाहेर येते. यात योनीमार्गातील आणि गुदद्वाराजवळ ई. कोलाय आणि कॅन्डिडा यांसारखे अनेक प्रकारचे जीवाणू असू शकतात. हे जीवाणू चेहऱ्याच्या त्वचेवर किंवा डोळ्यांमध्ये गेल्यास गंभीर संक्रमण होऊ शकते, ज्यामुळे त्वचेला लालसरपणा, पुरळ किंवा सूज येऊ शकते. रक्तामध्ये असलेल्या घटकांमुळे काही प्रकारच्या संवेदनशील त्वचेला अ‍ॅलर्जी किंवा तीव्र जळजळ होऊ शकते.

Web Title : वायरल ट्रेंड: चेहरे पर मासिक धर्म का खून लगाना - एक जोखिम भरा ब्यूटी हैक

Web Summary : मासिक धर्म के खून को फेस मास्क के रूप में इस्तेमाल करने का एक वायरल ट्रेंड जोर पकड़ रहा है। कुछ लोग चमकती त्वचा जैसे फायदे बताते हैं, वहीं विशेषज्ञ संभावित संक्रमणों और एलर्जी की प्रतिक्रियाओं की चेतावनी देते हैं। इस अभ्यास में वैज्ञानिक प्रमाणन का अभाव है और यह स्वास्थ्य जोखिम पैदा करता है।

Web Title : Viral Trend: Applying Menstrual Blood to Face - A Risky Beauty Hack

Web Summary : A viral trend of using menstrual blood as a face mask is gaining traction. While some claim benefits like glowing skin, experts warn of potential infections and allergic reactions. The practice lacks scientific validation and poses health risks.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.