Join us  

गणिताच्या टिचरला 'बकरी' म्हणायचे विद्यार्थी, त्यांनी सांगितलेलं कारण ऐकून शिक्षिकेच्या डोळ्यात आलं पाणी..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 6:38 PM

Math's teacher finds out why her students call her goat : इयत्ता आठवीच्या एका गणिताच्या शिक्षिकेला कळले की तिचे विद्यार्थी तिला (GOAT)बकरी म्हणतात. अनेक दिवसांपासून ती या गोष्टीच्या गोंधळात होती.

जगभरात असे अनेक विद्यार्थी असतील ज्यांना गणितांच्या शिक्षकांची भिती वाटते. गणिताच्या तासाला एखादा प्रश्न विचारला नंतर बरेच विद्याथी एखादं भूत बघितल्यासारखं तोड करतात. तर काहीजण रडायला सुरूवात करतात. सोशल मीडियावर एका  गणिताच्या शिक्षिकेची एक पोस्ट व्हायरल होत आहे. (Math's teacher finds out why her students call her goat) ज्यामध्ये तिच्या विद्यार्थ्यांनी तिला GOAT म्हटल्याने शिक्षिका अनेक दिवस गोंधळात पडली होती. पण जेव्हा तिला खरे कारण कळले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले. (Math's teacher left in tears when she knows why students call her goat)

इयत्ता आठवीच्या एका गणिताच्या शिक्षिकेला कळले की तिचे विद्यार्थी तिला (GOAT)बकरी म्हणतात. अनेक दिवसांपासून ती या गोष्टीच्या गोंधळात होती. या सगळ्यानंतर असे काय झाले की विद्यार्थ्यांनी आपली चेष्टा करायला सुरुवात केली, असे तिला वाटले.  शिक्षिकेनं सोशल मीडियावर आपली चिंता व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांचा हा 'विनोद' समजून घेण्यासाठी Reddit वापरकर्त्यांना मदत मागितली. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर प्रश्न करत त्यांनी लिहिले, विद्यार्थी मला बकरी का म्हणतात? यावर लोकांच्या प्रतिक्रिया आणि या शब्दाचा संपूर्ण अर्थ समोर आला. GOAT चा अर्थ बकरी नसून (Greatest Of All Time) असा आहे.  हे कळले तेव्हा शिक्षिकेच्या डोळ्यात पाणी आले. या शब्दाचा अर्थ वाचून शिक्षिकेला आश्चर्य वाटले. ही पोस्ट Reddit वर 3 दिवसांपूर्वी No Stupid Questions फोरमवर शेअर केली होती. कॅप्शन लिहिले - 'शब्दाचा अर्थ कळल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले. माझा विश्वासच बसत नाही की मुलं संपूर्ण वेळ माझी स्तुती करत होती. या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे आभार.

सलाम! वारी चालून थकलेल्या पायांची सेवा करणारे तरुण-तरुणी, पाहा व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर पोस्ट शेअर केल्यापासून आतापर्यंत 41 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. तर 1800 हून अधिक वापरकर्त्यांनी यावर आपला अभिप्राय नोंदवला आहे. एका वापरकर्त्यानं म्हटलं की जर तुम्ही हे टोपणनाव मिळवले असेल तर याचा अर्थ असा आहे की मुले तुमच्यावर खूप प्रेम करतात. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया