Join us

Smriti irani : मणिपूरी गाण्यावर स्मृती ईराणींनी धरला ठेका; केंद्रीय मंत्र्यांचा अनोख्या नृत्य प्रकाराचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 15:05 IST

Manipur Election 2022 : या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी मणिपुरी डान्स कसा आनंदात करत आहेत हे तुम्ही पाहू शकता. स्मृती गोल गोल फिरून नाचत होत्या.

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) स्टार प्रचारकांपैकी एक असलेल्या स्मृती इराणी (Smriti irani) यांचे शुक्रवारी अनोखे रूप पाहायला मिळाले. खरं तर मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या प्रचारासाठी आलेल्या स्मृती इराणी वेगळ्याच मूडमध्ये दिसल्या. त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी स्थानिक महिलांसोबत पारंपारिक नृत्य सुरू केले. त्याच्या डान्सचा एक व्हिडिओही समोर आला आहे. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी २८ फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता ५ मार्चला होणार आहे. (Smriti irani dance with artists performing traditional dance in manipur watch viral video)

शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी भाजपच्या प्रचारासाठी मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पोहोचल्या. स्मृती इराणी यांनी भाजपची धोरणे आणि आतापर्यंतच्या यशाबद्दल येथे सार्वजनिकपणे सांगितले. विशेष म्हणजे यादरम्यान केंद्रीय मंत्री खूपच खूश दिसत होत्या. यावेळी त्यांनी महिलांसोबत मणिपूरचे पारंपरिक नृत्य सादर केले.

स्मृती इराणींना महिलांनी पारंपारीक स्कार्फ घातला

तेथील महिलांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांना प्रथम पारंपरिक स्कार्फ गळ्यात परिधान केला. यानंतर त्यांच्या स्वागतात नृत्यही सादर करण्यात आले. अभिनयानंतर राजकारणी बनलेल्या स्मृती इराणी यांनीही महिलांच्या स्टेपमध्ये सामील होऊन भरपूर डान्स केला. 

या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी मणिपुरी डान्स कसा आनंदात करत आहेत हे तुम्ही पाहू शकता. स्मृती गोल गोल फिरून नाचत होत्या. केंद्रीय मंत्र्यांचा हा डान्स लोकांना खूप आवडला. त्याचवेळी स्मृती इराणी यांचा डान्स पाहून त्यांच्यासोबत तेथे पोहोचलेले भाजप नेते आणि कार्यकर्ते टाळ्या वाजवताना दिसले.

टॅग्स :स्मृती इराणीसोशल व्हायरलनृत्य