"पुढचा लेफ्ट घे" किंवा "पुढून डावीकडे वळ" असे बाजूला बसलेला सांगतो. आपण पटकन उजवा सिग्नल देतो आणि उलट्या दिशेने गाडी फिरवतो. मग पुन्हा वळसा घालून यायचे. नंतर लेफ्ट घ्यायचा. हा किस्सा तर सगळ्यांसोबतच झाला असेल. डावं - उजवं या बाबतीत होणारा गोंधळ तसा मजेशीरच. (Look at what the young woman did to avoid making a 'left or right' mistake while driving, the photo went viral)महिला काय आणि पुरुष काय या गडबड सगळ्यांचीच होते. नवीन चालक असेल तर मग मेंदू पटकन कमांडच घेत नाही, घाईत चुकीचा टर्न मात्र नक्कीच घेतो. मग साध्या दिशाही कळत नाहीत का किंवा डावं-उजवं कसं कलत नाही तुला असे टोमणेही ऐकावे लागतात. ही गडबड का होते? त्याचे उत्तर म्हणजे मोठाच विषय.
अशीच गोंधळाची परिस्थिती अनेकदा अनुभवलेल्या एका हुशार मुलीने मात्र यावर भन्नाट उपाय शोधला. तिचा सोशल मिडियावरील फोटो पाहून लोकं लोटपोट हसली आणि असे करायला अजिबात हरकत नाही रस्ता चुकण्यापेक्षा उलट चांगलंच आहे असे म्हणाले. तिने गाडी चालवताना हातात हातमोजे घातले आणि उजव्या हातावर राईट आणि डाव्या हातावर लेफ्ट असं मोठ्या अक्षरात लिहिलं. बस्स! आता कोणी 'डावीकडे वळ' म्हटलं की ती हाताकडे बघते आणि आत्मविश्वासाने योग्य टर्न घेते.
हा उपाय जितका साधा तितकाच मजेशीर आहे. कारण आपण सगळेच कधी ना कधी या लेफ्ट-राईटच्या गोंधळाला बळी पडलो आहोत. काही जण हातावर 'L' लिहितात, काही जण अंगठा आणि तर्जनीची 'L' शेप करून ओळखण्याचा प्रयत्न करतात. पण ग्लोव्हजवर मोठ्या अक्षरात दिशा लिहिण्याची कल्पना खरंच भन्नाट आहे. गडबड होण्याची श्क्यताच नाही. जे खरंच फार गोंधळतात त्यांच्यासाठी छान उपाय आहे.
या छोट्याशा युक्तीमुळे तिचा ताण कमी झाला, घाबरून चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता कमी झाली आणि ड्रायव्हिंग करताना आत्मविश्वास वाढला. विशेष म्हणजे, हा उपाय फक्त नवशिक्यांसाठीच नाही तर ज्या लोकांना नेहमीच दिशा लक्षात ठेवताना क्षणभर गोंधळ होतो त्यांच्यासाठीही उपयोगी ठरू शकतो.
सोशल मीडियावर अशी कल्पकता लगेच व्हायरल होते, कारण ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील छोट्या पण खऱ्या समस्येला हात घालते. राईट-लेफ्टचा घोळ हा काही लाजिरवाणा नाही. तो मानवी स्वभावाचा भाग आहे. पण त्यावर असा मजेशीर आणि फायद्याचा उपाय शोधणे, हीच खरी स्मार्टनेसची खूण आहे.
Web Summary : Struggling with left and right while driving? A woman's clever solution using labeled gloves is going viral. This simple trick boosts confidence and prevents wrong turns, proving helpful for both new and experienced drivers prone to directional mix-ups. A practical and humorous solution resonated online.
Web Summary : ड्राइविंग करते समय लेफ्ट-राइट में भ्रम होता है? एक महिला का लेबल वाले दस्तानों का उपयोग करने का चतुर समाधान वायरल हो रहा है। यह सरल तरकीब आत्मविश्वास बढ़ाती है और गलत मोड़ से बचाती है, जो दिशा भ्रम वाले नए और अनुभवी दोनों ड्राइवरों के लिए सहायक साबित होती है। एक व्यावहारिक और हास्यपूर्ण समाधान ऑनलाइन पसंद किया गया।