Join us

बघा तिची हिंमत! छेड काढायला आलेल्या ६ जणांना तिने एकटीने मारलं..बघा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 19:49 IST

Bravery of a women: प्रत्येक मुलगी असावी अशीच हिंमतवाली.. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही या मुलीच्या हिमतीची नक्कीच दाद द्याल. बघा हा सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झालेला व्हिडिओ.

ठळक मुद्देअवघ्या दोन- तीन दिवसांपुर्वी शेअर झालेल्या या व्हिडिओला तब्बल ३.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

जगाचा कोणताही कानाकोपरा असू दे आणि त्यातलं कोणतंही शहर असू दे. तरुण मुलींना, महिलांना नेहमीच छेडछाडीचा सामना करावा लागतो. आपल्याकडे भारतातही वातावरण काही वेगळं नाही. अगदी रोजच्या रोज आपण तरुणींची छेड काढल्याच्या बातम्या ऐकतो, वाचतो, बघतो. बलात्काराच्या घटनाही आपल्याकडे भरपूर असतात. अशा घटना रोजच्याच झाल्या आहेत, काही ठिकाणचं वातावरण मुलींसाठी अगदीच असुरक्षित आहे, पण म्हणून मुली काही घराबाहेर पडणं सोडू शकत नाहीत. त्यांना या वातावरणात रहायचं असेल, तर अशा घटनांना हिमतीने सामना करावाच लागेल. अशी अवघड परिस्थिती आपल्यावर आली तर त्या संकटातून स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचं, हे शिकावच लागेल. त्यासाठीच तर हा व्हिडिओ प्रत्येक मुलीने, महिलेने एकदा बघायलाच हवा.

 

सोशल मिडियावर सध्या जबरदस्त व्हायरल झालेला हा व्हिडिओ Figen@TheFigen या ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या दोन- तीन दिवसांपुर्वी शेअर झालेल्या या व्हिडिओला तब्बल ३.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. "Don't mess with the girl! Hiyaaaaaaaaaaaaaa!" अशी कॅप्शन दिलेला हा व्हिडिओ सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याचा अंदाज या व्हिडिओवरून येत नाही.

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एक अगदीच सुनसान रस्ता आहे. या रस्त्यावरून एक मुलगी चालली असता जवळपास ६ रोडरोमियो एकत्रच तिच्याजवळ आले आणि तिच्यासोबत छेडछाड करू लागले. सुरुवातीला त्यांनी तिला पुर्णपणे घेरून टाकलेलं दिसतं. आता ही एकटीच काय करणार, असं एक क्षणभर आपल्याला वाटू लागतं. पण तेवढ्यातच ती अतिशय खमकी होऊन सगळी हिंमत, बळ एकवटून त्या सहाही जणांवर अक्षरश: तुटून पडते. तायक्वांदो, कराटे यातले प्रकार करून ती स्वत:चे संरक्षण तर करतेच पण त्या सगळ्यांना एकसाथ चांगलाच चोप देते. एखाद्या चित्रपटांत शोभून दिसावं, असं हे दृश्य आहे. प्रत्येक मुलीला जर असे स्वसंरक्षणाचे धडे मिळाले आणि त्याचा उपयोग त्या मुलीने अचूक पद्धतीने करून घेतला तर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या आपल्याकडे निम्म्यापेक्षाही कमी होईल, यात शंकाच नाही. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलमहिलाट्विटर