Long Weekend's In 2026 : नवीन वर्ष येताच लोकांना या वर्षात पडणाऱ्या सुट्टी आणि लॉंग वीकेंड जाणून घेण्याची उत्सुकता असते. कारण अनेकांना त्यांचं त्यांचं प्लानिंग करायचं असतं. २०२६ मधील लॉन्ग वीकेंड्स तुम्ही नक्कीच आधीच जाणून घेतले पाहिजेत. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे फिरण्याचे प्लॅन करू शकता. आपल्याला वाचून नक्कीच आनंद होईल की येणाऱ्या वर्षात जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत अनेक लॉन्ग वीकेंड्स येणार आहेत. म्हणजेच २०२६ हे वर्ष प्रवासप्रेमी लोकांसाठी खूपच उत्तम ठरणार आहे. तुम्ही येत्या वर्षात अनेक ट्रिप्स प्लॅन करू शकता.
जानेवारी ते फेब्रुवारी – सर्वात आधी जानेवारी महिन्यात लॉन्ग वीकेंड येणार आहे. २६ जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. २४ आणि २५ जानेवारी हे वीकेंड असून २६ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी आहे. फेब्रुवारी महिन्यात मात्र कोणताही लॉन्ग वीकेंड नाही.
मार्च आणि एप्रिल – ४ मार्च म्हणजेच बुधवारी होळी आहे. मार्च महिन्यात होळीपूर्वी दोन दिवसांची सुट्टी घेतल्यास आपल्याला चांगला लॉन्ग वीकेंड मिळू शकतो. एप्रिल महिन्यातही एक लॉन्ग वीकेंड आहे. ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे आहे.
मे ते जून – १ मे म्हणजेच शुक्रवार हा बुद्ध पौर्णिमेचा दिवस आहे. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला लॉन्ग वीकेंड मिळेल. जून महिन्यातही एक लॉन्ग वीकेंड आहे. २६ जून म्हणजेच शुक्रवारी मोहरम आहे.
जुलै आणि ऑगस्ट – जुलै महिन्यात कोणताही लॉन्ग वीकेंड नाही. ऑगस्टमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक लॉन्ग वीकेंड मिळेल. रक्षाबंधन २८ ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारी आहे.
सप्टेंबर ते ऑक्टोबर – सप्टेंबर महिन्यात एक नव्हे तर दोन लॉन्ग वीकेंड्स मिळतील. पहिला लॉन्ग वीकेंड जन्माष्टमीमुळे येणार आहे. ४ सप्टेंबर म्हणजेच शुक्रवारी जन्माष्टमी आहे. दुसरा लॉन्ग वीकेंड गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मिळेल. १४ सप्टेंबर म्हणजेच सोमवारी हा सण आहे.
ऑक्टोबर महिन्यात तर तीन लॉन्ग वीकेंड्स मिळतील. पहिला २ ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारी गांधी जयंतीमुळे. दुसरा १९ ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी महाअष्टमी आणि २० ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी दसरा असल्यामुळे. त्यानंतर तिसरा लॉन्ग वीकेंड २६ ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी वाल्मीकी जयंतीमुळे मिळेल.
नोव्हेंबर आणि डिसेंबर – नोव्हेंबरमध्ये एक लॉन्ग वीकेंड आहे. ९ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारी गोवर्धन पूजा आहे. डिसेंबर म्हणजेच २०२६ वर्षाच्या शेवटीही एक लॉन्ग वीकेंड मिळेल. २५ डिसेंबर म्हणजेच शुक्रवार हा ख्रिसमसचा दिवस आहे.
चला तर मग आता आपल्याला लॉन्ग वीकेंडची माहिती तर मिळाली. त्यामुळे आपण आपलं प्लानिंग आतापासून करून ठेवू शकता. जेणेकरून वेळेवर धावपळ किंवा काही गोंधळ होणार नाही.
