माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या त्याला जगण्यासाठी काय लागतं? या प्रश्नाचं शाळेत असताना अन्न, वस्त्र, निवारा हे एवढंच उत्तर आपल्याला माहिती होतं. मात्र या गरजा पुरवण्यासाठी काय लागतं ? तर पैसा. पोटभरण्यापासून डोक्यावर छप्पर मिळवण्यापर्यंत सारेच पैशावर अवलंबून. (Living in America is not affordable, even after earning crores, the couple claims! )पैसे कमवण्यासाठी रक्ताचे पाणी करुन माणसं काम करतात. मात्र आजकाल पैशाने समाधान विकत घेता येत नाही. कितीही कमवा कमीच पडते. आयुष्य कसे जगायचे हे ठरवले असले तरी त्यानुसार जगता येतेच असे नाही. सगळ्यांच्याच नशीबात ते सुख नाही. असाच एक अनुभव एका जोडप्याने सोशल मिडियावर शेअर केला. लाखो पैसे कमवले तरी साधे चांगले घर घेऊन राहता येत नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.
एका भारतीय टेक व्यावसायिकाने अमेरिकेमध्ये दहा वर्षे राहिल्यानंतरच्या आपल्या अनुभवाची गोष्ट शेअर केली आहे. त्याने आणि त्याच्या पत्नीने मिळून एकूण $१.३५ दशलक्ष (अंदाजे ११ कोटींपेक्षा जास्त) कमावले. दोघांनीही जॉब केला. कष्ट केले. दिवसरात्र मेहनत घेतली. एवढे पैसे साठवल्यानंतर आम्हाला सुखी आयुष्य जगता येईल असे वाटत होते. मात्र हा फक्त भ्रम होता. आम्ही आजही आर्थिकदृष्ट्या समाधानकारक जीवन जगू शकत नाही. अमेरिकेत स्थायिक होणे सोपे नाही. कितीही कमवले तरी संपतेच असे त्यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की उच्च उत्पन्न असूनही घर खरेदी, मुलांचे शिक्षण, आरोग्य विमा आणि इतर गरजा यावर होणारा खर्च इतका वाढलेला आहे की बचत करणे अवघड झाले आहे. त्यांना भारतात परत जाण्याचा विचारही अनेकदा आला, कारण अमेरिकेतील जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
अनेक भारतीय अमेरिकेत शिफ्ट होतात. तिकडेच राहण्याची स्वप्न रंगवतात. सोशल मिडियावर अनेक जण आपले अनुभव सांगतात. काहींचे चांगले असतात तर काहींचे वाईट. आम्ही आता सिंगापुरला शिफ्ट होण्याचा विचार करत आहोत. तसेच पुढे भारतातच जाऊन राहू असेही ते म्हणतं आहेत. त्या दोघांनाही ऑफीसमध्येही चांगली वागणूक मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. भेदभाव केला जातो. तसेच मानसिक छळ होतो. पैश्याने समाधान कमवता येत नाही. असेही त्याने म्हटले. हा अनुभव अनेकांना येतो. अनेक भारतीय नागरिक आहेत जे परदेशात स्थायिक होण्याच्या स्वप्नाने जातात. पण प्रत्यक्षात आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आव्हानांचा सामना जास्त करावा लागतो.