Lokmat Sakhi >Social Viral > नोकरी करणाऱ्या चारचौघींसारखीच दीपिका पादुकोणला छळतेय ‘तीच’ समस्या, लहान बाळ की करिअर.. 

नोकरी करणाऱ्या चारचौघींसारखीच दीपिका पादुकोणला छळतेय ‘तीच’ समस्या, लहान बाळ की करिअर.. 

एवढीच मुलीची काळजी तर घरी बस! दीपिका पादुकोणला जिथे सल्ले देतात, तिथे सामान्य नोकरदार महिलांचे हाल कोण विचारणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 18:09 IST2025-06-18T18:08:45+5:302025-06-18T18:09:28+5:30

एवढीच मुलीची काळजी तर घरी बस! दीपिका पादुकोणला जिथे सल्ले देतात, तिथे सामान्य नोकरदार महिलांचे हाल कोण विचारणार..

Like all working women, Deepika Padukone is plagued by the same problem: a small child or a career. | नोकरी करणाऱ्या चारचौघींसारखीच दीपिका पादुकोणला छळतेय ‘तीच’ समस्या, लहान बाळ की करिअर.. 

नोकरी करणाऱ्या चारचौघींसारखीच दीपिका पादुकोणला छळतेय ‘तीच’ समस्या, लहान बाळ की करिअर.. 

Highlightsमूल झाल्यानंतर महिलांनी काहीही सवलत मागितली अगदी घरुन काम करण्याची परवानगी, प्रवासाला नकार किंवा मुलांची आजारपण तर ते आजही आपल्या समाजाला किंवा कार्यपद्धतीला अवास्तवच वाटते.

सोपं असतं का आईपण? तर नाही! लहान लेकरु घरी सोडून कामावर जाणं प्रत्येक आईला जड जातं. मग ती सुपरस्टार असो नोकरदार असो की मजूर! दीपिका पादूकोणने नुकतंच सांगितलं की मी आठ तासच काम करणार, त्याहून जास्त नाही तर त्यावरुन केवढी चर्चा आहे. तिच्या हातातून सिनेमा गेला. अप्रत्यक्ष लोक म्हणत आहेत की नाही ना होत काम पोर सांभाळून मग बस घरी! पण इतकं सोपं असतं का आईनं काम सोडून देणं. वर्षानूवर्षे मेहनत करुन घडवलेलं करिअर सोडून देणं? बाकी जाऊ द्या, ज्यांना पोट भरण्यासाठी नोकरी करणं भाग आहे त्या आयांना तर नोकरी सोडण्याचा विचार करण्याचंही स्वातंत्र्य नाही. दीपिकाच्या निमित्ताने जुनीच वाटेल अशी चर्चा परत एकदा सुरु झाली आहे. 


एखादी स्त्री आई झाली की जन्मभर तिचं आईपण सरत नाही. बाळाच्या काळजीचं गाठोडं ती प्रत्येक ठिकाणी डोक्यावर घेऊनच वावरत असते. आता हेच बघा ना दीपिका पादूकोण काही महिन्यांपुर्वी आई झाली आणि तिने पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायचं ठरवलं. आता पुर्वी जशी बेधडकपणे ती काम करायची, तसं आता लेकीमुळे शक्य होणार नाही हे तिने सांगितलं आणि दिग्दर्शकासमोर ८ तासांची शिफ्ट करण्याची अट ठेवली. यासोबतच तिने इतरही काही अटी ठेवल्या पण त्या दिग्दर्शकाने मान्य केल्या नाहीत आणि तिची चित्रपटातून हकालपट्टी केली. आता या प्रकरणावरून दीपिकाची ८ तासांची शिफ्ट हे प्रकरण खूप गाजते आहे. 
 तिची लेक अवघ्या काही महिन्यांची असून तिला आईची गरज आहे. आणि सोबत दीपिका स्टार आहे कुणीही पुरुष सुपरस्टार हल्ली ज्या गोष्टी मागतो त्याच तिनंही मागितल्या की चित्रपटाला मिळणाऱ्या नफ्यातला वाटा, घसघशीत मानधन, स्टाफची स्वतंत्र व्यवस्था हवी. पण ते बहूतेक सारे फिस्टकलेच आणि इतकं सारं मागते आहे तर आठ तास काम करणार कशाला असा सवालही करण्यात आला. या सगळ्याचा एकत्रित परिणामही असावा पण तो सिनेमा काही तिला मिळाला नाही. मात्र कामाचे तास हा विषय मात्र चर्चेत राहिलाच.

 

 आता नेमक्या याच मुद्द्यावर अनेक प्रतिक्रिया समोर येत असून अभिनेत्री जेनेलिया डिसुझाची प्रतिक्रियाही खूप बोलकी आहे. जेनेलियाचा आमिर खानसोबतचा चित्रपट येतो आहे. त्या पार्श्वभुमीवर एका मुलाखतीत ती म्हणाली की आई म्हणून ८ ते १० तास शुटींग करणं खरोखरच अवघड आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही. तिने स्वत:चाही अनुभव सांगितला. प्रसंगी तिला १० ऐवजी १२ तास काम करावं लागलं होतं. पण कधीकधी असं होतंच. 
जेनेलिया, आलिया भट, करिना कपूर यासाऱ्यांनीच आपलं काम सांभाळत मूल सांभाळत सारं निभावलं आहेच. आणि अनुष्कासारखं कुणी काम काही काळ न करण्याचाही निर्णय घेतला आहे.
आपलं मूल सांभाळून कुणी कामाचा काय निर्णय घेतो यात चूक बरोबर ठरवून जजमेंटल होण्यात अर्थ नसतो. पण एक मात्र खरं की मूल झाल्यानंतर महिलांनी काहीही सवलत मागितली अगदी घरुन काम करण्याची परवानगी, प्रवासाला नकार किंवा मुलांची आजारपण तर ते आजही आपल्या समाजाला किंवा कार्यपद्धतीला अवास्तवच वाटते.
दीपिकालाही सुचवले जातेय की मुलगी हीच जर तिची सध्याची प्रायोरिटी असेल तर तुझ्याकडे आर्थिक स्थैर्य आहे. ब्रेक घे. बाळाला वेळ दे आणि काही दिवसांनी कामाला कर. पण असे सल्ले वडिल झालेल्या कुणा सुपरस्टारला किंवा अगदी सामान्य पुरुषालाही कुणी देतं का? मूल झालं म्हणून पुरुषांचं काम थांबतं का? तर नाही. 


पण महिलांना मात्र दोनच पर्याय दिले जातात. एकतर मूल सांभाळून हाल सहन करत धावपळ करत काम कर, कारणं -सवलती न मागता काम कर नाहीतर सरळ घरी बस. तिसरा समजून घेण्याचा, सुविधा देण्याचा मार्गच नाही कारण ते मागणं हाच दोष मानला जाण्याची आपल्याकडची पारंपरिक मानसिकता अजून बदललेली नाही. आणि दीपिकासारखी जी कुणी ते मागेल तिलाच चूक ठरवलं जाण्याचा धोका असतोच. सध्या तेच घडतं आहे.

 

Web Title: Like all working women, Deepika Padukone is plagued by the same problem: a small child or a career.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.