दीपावलीच्या(Diwali 2025) दिवसांत लक्ष्मी पूजनाचे विशेष महत्व आहे. या दिवशी लक्ष्मी मातेचे पूजन करून घराची, कुटूंबाची, व्यवसायाची भरभराट होण्यासाठी प्रार्थना केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही खास रंग परीधान केले तर सकारात्मकता आणि सुख, समृद्धी टिकून राहते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आणि त्याचे महत्व काय समजून घेऊ. (Colours Of Outfits Wear on Diwali Laxmi Pujan to get Blessing Of Maa Laxmi)
१) लाल रंग
लाल रंग हा रंग शक्ती, सौभाग्य, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक आहे. देवी लक्ष्मीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे आणि तिला लाल रंगाची साडी किंवा चुनरी अर्पण केली जाते. लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते आणि आत्मविश्वास वाढतो.
२) सोनेरी किंवा पिवळा रंग
सोनेरी रंग थेट धन, ऐश्वर्य आणि सफलता दर्शवतो. दिवाळीतील दिवे आणि झगमगाट याच रंगाचे प्रतीक आहेत. पिवळा रंग हा शुभ, आनंद आणि देवगुरु बृहस्पतीशी संबंधित आहे. पिवळे वस्त्र परिधान केल्याने घरात प्रकाश, यश आणि ज्ञान येते, तसेच लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचीही कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे.
३) केशरी रंग
केशरी रंग ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकता दर्शवतो. हा रंग धार्मिक विधींमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.हे वस्त्र परिधान केल्याने मन:शांती आणि घरात उत्सवाचे वातावरण टिकून राहते.
४) पांढरा रंग
पांढरा रंग पवित्रता, शुद्धता आणि मानसिक शांती दर्शवतो. हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. जरी लाल आणि सोनेरी रंग अधिक आकर्षक असले तरी, पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने घरात समृद्धी आणि शांतता टिकून राहते.
५) हिरवा रंग
काही ज्योतिष शास्त्रानुसार, हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे, जो आर्थिक वृद्धी, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येतो. पूजनासाठी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करू शकते.