Join us  

मेहंदी ब्लाउज: फॅशनचा नवाच ट्रेंड! मेहंदीच्या दुनियेतले भन्नाट प्रयोग, मेहंदी स्लिव्ह्ज ते हिना आर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 4:38 PM

Social Viral: हातावर मेहंदी, पायावर मेहंदी हे प्रकार माहिती होते.... पण आता चक्क ब्लाऊजच्या जागेवर मेहंदी (mehendi trend) आली आहे... काय म्हणावं आता लोकांना, त्यांच्या हौसेला आणि या भलत्याच फॅशन ट्रेण्डला (fashion)...

ठळक मुद्देसोबर लूकमध्ये अशी हटके स्टाईल करायची असेल तर मेहंदी आर्म्स किंवा मेहंदी ब्रेसलेट अशी स्टाईल तुम्ही करू शकता.

फॅशनच्या नावाखाली कोण काय करेल काही सांगता येत नाही... कधी रिप्ड जीन्सच्या (jeans) नावाखाली चांगली जीन्स फाडली जाते तर कधी सगळेच रंग डोक्यावर ओतून केस कलर (hair colour) केले जातात. आता असाच एक फॅशनचा भन्नाट ट्रेण्ड येऊ पाहतो आहे. ही फॅशन आहे मेहंदीची. आता मेहंदी हातावर, पायावर, नखांवर आणि फार फार तर केसांवर लावली जाते, एवढं आपण ऐकलेलं होतं. पण आता मेहंदी बाबतही लोकांनी अजब- गजब प्रकार करायला सुरूवात केली आहे. म्हणूनच तर एका लग्नात गेलेली एक महिला चक्क ब्लाऊजच्या ऐवजी मेहंदीच (heena blouse) लावून गेली.. तिच्या अंगावरची मेहंदी अतिशय सुबक आणि रेखीव तर होतीच, पण मेहंदी पेक्षाही तिच्या बोल्डनेसचीच (bold and hot) जास्त चर्चा झाली.

मेहंदीचा हा अजब ट्रेण्ड (new trend) सध्या भलताच गाजत आहे. दिवाळी होऊन आता आपल्याकडे भारतात मोठ्या धामधुमीत लग्नसराईला (marriage) सुरुवात झाली आहे. लग्न म्हणलं की मेहंदी आलीच. नवरा- नवरीच्या मेहंदीसोबतच सगळ्या वऱ्हाडी मंडळींनाच आपल्याकडे मेहंदी लावली जाते. म्हणूनच तर मेहंदीचा हा लेटेस्ट ट्रेण्ड (Latest trend) सध्या फुल फॉर्ममध्ये आहे. मेहंदी ब्लाऊज, मेहंदी स्लिव्ह्ज किंवा मेहंदी आर्म, मेहंदी ब्रेसलेट अशा वेगवेगळ्या प्रकारात मेहंदी लावली जात आहे. नावं ऐकून तुम्हाला ही मेहंदी कशी आणि कुठे लावली जाते, याचा एकंदरीत अंदाज आलाच असेल.

photo credit- google

तर अशाच प्रकारची ब्लाऊज मेहंदी काढून एका महिलेने एका विवाह सोहळ्यात हजेरी लावली होती. ब्लाऊज मेहंदी म्हणजे शरीरावर ज्या ठिकाणी ब्लाऊज असते, त्याठिकाणी मेहंदीची नक्षी काढायची. पांढरी साडी आणि मेहंदी ब्लाऊज असा वेशभुषेतील या महिलेचा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर झालेल्या या व्हिडियोला अल्पावधीतच लाखो लाईक्स मिळाले आहेत. या महिलेच्या अंगावर रेखाटलेली मेहंदीची डिझाईन खरोखरंच खूप ॲट्रॅक्टीव्ह आहे. 

photo credit- google

मेहंदी आर्म्स या प्रकारात स्लिव्ह्जलेस ब्लाऊज घातले जाते आणि दंडावर ब्लाऊजच्या बाह्या असतात त्याप्रमाणे मेहंदी काढली जाते. मेहंदी ब्लाऊजपेक्षा हा प्रकार थोडा सोबर लूक देणारा आहे. तसेच मेहंदी ब्रेसलेट या प्रकारात हाताच्या मनगटावर ब्रेसलेट किंवा बांगडीसारखी नक्षी काढली जाते. सध्या या प्रकारात एकापेक्षा एक जबरदस्त डिझाईन्स आहेत. त्यामुळे सोबर लूकमध्ये अशी हटके स्टाईल करायची असेल तर मेहंदी आर्म्स किंवा मेहंदी ब्रेसलेट अशी स्टाईल तुम्ही करू शकता.

photo credit- google

यासाठी वापरण्यात येणारी मेहंदी थोडी वेगळी असते. आपली जी साधारण मेहंदी असते तिची नक्षी काही काळात सुकते आणि निघून जाते. त्यानंतर मेहंदीला लाल रंग येतो. पण अशा प्रकारच्या आर्टसाठी स्केचपेनप्रमाणे काळपट असणारी मेहंदी वापरली जाते. ही मेहंदी सुकल्यानंतर कोरडी पडून निघून जात नाही.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामब्यूटी टिप्सफॅशन