Join us  

Kranti Redkar's Viral Post : 'आमच्याकडे दुपारच्या जेवणात दाल मखनी अन् जिरा राईस,' व्हायरल होतेय क्रांती रेडकरची दिवाळी 'फटाका' पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 10:52 AM

Kranti Redkar's Viral Post : 'जर उद्या सकाळी आम्ही सरकारी अधिकाऱ्याचे जेवण खाल्ले असा आरोप केला तर?''

(Image Credit- Social Media)

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) पती समीर वानखेडेंनी (Sameer wankhede) ड्रग्स प्रकरणी आर्यन खानवर केलेली कारवाई आणि नवाब मलिकांचे (Nawab Malik) आरोप यामुळे  बरीच चर्चेत होती.  क्रांती आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून नेहमीच चाहत्यांसाठी मनोरंजनात्मक व्हिडीओ तर कधी फोटो शेअर करत असते.  लग्नानंतर क्रांती फारशी चित्रपटांमध्ये झळकली नाही पण तिच्या पोस्ट मात्र तुफान चर्चेत असतात. सध्या क्रांतीनं शेअर केलेल्या दुपारच्या जेवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Kranti Redkar's Viral Tweet post)

क्रांतीच्या या ट्विटमध्ये  तिनं दाल मखनी (Dal Makhani) आणि जीरा राईसचा (Jeera Rice) फोटो शेअर केला असून याच्या बाजूला लिहिले की, आमच्याकडे दुपारच्या जेवणासाठी दाल मखनी आणि जीरा राईस होतं. राईस आम्ही घरी बनवला होता आणि दाल मखनी बाहेरून मागवली होती. त्याचं बील १९० रूपये इतकं होतं. 

मला पुराव्यांसह सोशल मीडियावर माहिती देणं गरजेचं वाटलं. कारण जर उद्या सकाळी आम्ही सरकारी अधिकाऱ्याचे जेवण खाल्ले असा आरोप केला तर?'' या ट्विटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी क्रांतीला पाठिंबा दिलाय तर काहींना नवाब मलिकांना असल्या पुराव्यांची गरज नसल्याचं म्हटलंय.

क्रांती रेडकरला दोन जुळ्या मुली आहेत. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करत क्रांती नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तर कधी तिच्या लहान मुलींमुळे चर्चेत असते. क्रांतीचाही कपड्यांचा आणि ज्वेलरीचा व्यवसाय आहे. क्रांतीच्या कपड्याच्या ब्रॅण्डचे नाव ‘झिया झायदा’ (ZiyaZyda) आहे तर क्रांतीने (KraKar) ज्वेलरी ब्रॅण्डसुद्धा लाँच केला आहे. 

क्रांतीने दुपारच्या जेवणात खाल्लेली दाल मखनी म्हणजे डाळीचा कुठला प्रकार? हे कसं बनवतात? असे प्रश्न तुमच्या मनात असतील या भन्नाट रेसेपीज एकदा नक्की घरी ट्राय करून पाहा

१)

२)

३)  

टॅग्स :क्रांती रेडकरसमीर वानखेडेसोशल व्हायरल