lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > काळीकुट्ट चहाची गाळणी स्वच्छ करण्याची १ सोपी ट्रिक, गाळणी होईल नव्यासारखी चकचकीत...

काळीकुट्ट चहाची गाळणी स्वच्छ करण्याची १ सोपी ट्रिक, गाळणी होईल नव्यासारखी चकचकीत...

Know How To Clean Tea Strainer easy and simple trick : आरोग्य चांगले राहण्यासाठी चहाची गाळणी स्वच्छ असायला हवी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2024 11:44 AM2024-01-08T11:44:09+5:302024-01-08T11:44:24+5:30

Know How To Clean Tea Strainer easy and simple trick : आरोग्य चांगले राहण्यासाठी चहाची गाळणी स्वच्छ असायला हवी.

Know How To Clean Tea Strainer easy and simple trick : 1 easy trick to clean black tea filter, the filter will be shiny like new... | काळीकुट्ट चहाची गाळणी स्वच्छ करण्याची १ सोपी ट्रिक, गाळणी होईल नव्यासारखी चकचकीत...

काळीकुट्ट चहाची गाळणी स्वच्छ करण्याची १ सोपी ट्रिक, गाळणी होईल नव्यासारखी चकचकीत...

भारतीय घरांमध्ये अगदी सर्रास केली जाणारी गोष्ट म्हणजे चहा. थंडीच्या दिवसांत तर चहा म्हणजे अमृतच. हवेत गारठा असल्याने तर सारखा चहा प्यावासा वाटतो. हा चहा प्यायचा म्हणजे तो गाळण्यासाठी गाळणी तर लागणारच. सतत चहा गाळल्यावर ही गाळणी कालांतराने काळीकुट्ट होऊन जाते. मग ती कितीही घासली तरी स्वच्छ होत नाही. त्यामुळे नंतर चहा गाळला जाण्याची क्रिया संथ होते. (Know How To Clean Tea Strainer easy and simple trick).. 

चहाचे कण अनेकदा इतके बारीक असतात की ही गाळणी कितीही घासली तरी ते कण निघतातच असे नाही. गाळणे कळकट्ट झाल्याने त्याच त्या गाळण्यातून गाळलेला चहा पिणे आरोग्यासाठीही चांगले नसते. गाळण्यांमध्ये प्लास्टीकची, स्टीलची, अॅल्युमुनिअमची अशा विविध प्रकारच्या गाळण्या असतात. स्वयंपाकघरात दिवसभरात बऱ्याच वेळा वापरली जाणारी ही गाळणी स्वच्छ करण्यासाठी १ सोपी आणि झटपट ट्रिक पाहूयात..

(Image : Google)
(Image : Google)

धातूचे गाळणे कसे साफ कराल? 

 स्टील किंवा अॅल्युमिनिअमचे गाळणे दणकट असल्याने ते वापरण्याला बरेच जण पसंती देतात. पण याच्या जाळीत चहाचा गाळ जास्त प्रमाणात अडकतो. असे गाळणे सगळ्यात आधी ते गॅस बर्नर सुरू करुन त्यावर चांगले गरम करावे. मग डीश वॉशर आणि स्क्रबरने ही गाळणी स्वच्छ घासायची. गरम झाल्याने आणि घासल्याने यात अडकलेले कण निघून येण्यास मदत होते. 

प्लास्टीकचे गाळणे साफ करण्यासाठी..

तुम्ही प्लास्टीकचे गाळणे वापरत असाल तर एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात डिटर्जंट पावडर घालायची. त्यात कपड्यांसाठी वापरतो ते व्हाईटनर घालायचे. प्लास्टीकची गाळणी या पाण्यात साधारण २ तासांसाठी भिजवून ठेवायची. ही गाळणी बाहेर काढल्यावर घासायचीही आवश्यकता नसते इतकी चकचकीत आणि नव्यासारखी दिसतात. 
 

Web Title: Know How To Clean Tea Strainer easy and simple trick : 1 easy trick to clean black tea filter, the filter will be shiny like new...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.