स्वयंपाक घरातील ओटा म्हणजे सर्वात महत्वाची जागा. स्वयंपाक घरातील याच ओट्यावर आपण अनेक काम सतत करत असतो. ओट्याचा वापर हा नेहमीचा असतोच, नेहमी वापरुन या ओट्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग पडून ओटा खराब दिसू लागतो. प्रत्येक गृहिणीसाठी स्वयंपाकघरातील ओटा स्वच्छ ठेवणे म्हणजे एक मोठे कठीण कामच असते. भाज्या निवडण्यापासून ते अन्नपदार्थ तयार करण्यापर्यंत किचनच्या ओट्यावर अनेक काम (Kitchen Slab Cleaning Tricks) सतत केली जातात. किचनचा ओटा (kitchen slab cleaning hacks) सतत वापरून कालांतराने खराब होतो, यावर तेल - मसाल्यांचे चिकट व हट्टी डाग पडू लागतात. यासाठीच, असा खराब झालेला ओटा वेळीच स्वच्छ करणे गरजेचे असते(best home remedies for kitchen slab cleaning).
ओट्याची स्वच्छता केवळ स्वयंपाकघराचे सौंदर्यच टिकवून ठेवत नाही, तर जंतूंपासून बचाव करण्यासाठीही ओटा स्वच्छ असणे खूप महत्त्वाचे असते. ओटा नेहमी स्वच्छ व नीटनेटका ठेवणे खूप गरजेचे असते. कारण इथेच अन्न तयार होते आणि थोडीशीही अस्वच्छता आरोग्यावर परिणाम करू शकते. आपण स्वयंपाकघरातील ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोप्या आणि उपयोगी टिप्स जाणून घेणार आहोत. या टिप्समुळे तुम्ही तुमच्या ओट्याला अगदी कमी वेळात आणि कमी श्रमात चमकदार आणि स्वच्छ बनवू शकता.
स्वयंपाक घरातील ओटा स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक...
१. बेकिंग सोडा :- बेकिंग सोडा (Baking Soda) हे एक असे घरगुती उत्पादन आहे जे जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध असतेच. हे फक्त बेकिंगसाठीच नाही, तर स्वच्छतेसाठीही खूप उपयुक्त आहे. सर्वप्रथम, ओट्यावर कोरडा बेकिंग सोडा शिंपडा. आता १० मिनिटे तसेच राहू द्यावे जेणेकरून ओट्यावरील चिकट, तेलकट डाग कमी होण्यास मदत होईल. नंतर एका स्क्रबरच्या मदतीने हलक्या हाताने घासून घ्या. आपण पाहू शकता की, हळूहळू डाग सहज निघू लागतील आणि ओट्याची जुनी चमक परत येईल. शेवटी, कोमट पाण्याने ओटा चांगला स्वच्छ धुवून घ्या.
२. तुरटी :- जर आपल्याकडे बेकिंग सोडा नसेल तर आपण तुरटीचा देखील वापर करु शकता. सर्वप्रथम, तुरटी घेऊन त्याची जाडसर पूड तयार करा. ही पूड ओट्यावरील घाण झालेल्या भागावर शिंपडा. १० मिनिटे तसेच राहू द्या. आता स्क्रबरने व्यवस्थित घासा आणि पुन्हा ५ मिनिटांसाठी तसेच राहू द्या. त्यानंतर, थोडे थोडे गरम पाणी टाकत पुन्हा एकदा घासून घ्या. शेवटी, स्वच्छ पाण्याने ओटा धुवून घ्या. या साध्यासोप्या घरगुती टिप्समुळे ओट्यावरील सर्व घाण निघून जाईल आणि त्याची चमक परत येईल. तुरटीचा फायदा असा आहे की ती फक्त डागच काढत नाही, तर किचनमधील कुबट दुर्गंधीही कमी करते.