स्वयंपाकघर म्हणजे घराचा सर्वात महत्त्वाचा भाग... आपल्या घरातील स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघरातील काही मोजकी भांडी अगदी दररोज वापरली जातातच. रोजच्या वापराने भांडी तर खराब होतातच, पण त्यांची चमकही हरवते. मग तो तवा असो, कढई असो वा कुकर...स्वयंपाकघर कितीही चकाचक असलं, तरी दररोज वापरला जाणारा प्रेशर कुकर, लोखंडी तवा आणि कढई हळूहळू काळी पडू लागते. त्यावर साचलेला तो चिकट, काळाकुट्ट थर साध्या साबणाने घासून निघत नाही आणि मग सुरू होतं तासंतास भांडी घासण्याचं कष्टाचं काम. त्यात भर म्हणून फ्रिज उघडला की येणारा उग्र वास डोकं सुन्न करतो.विशेषतः कढई किंवा प्रेशर कुकरच्या तळाला बसलेला काळा थर काढताना फार दमछाक होतेच. अनेकदा फ्रिजमध्ये ठेवलेल्या पदार्थांमुळे फ्रिजला एक प्रकारची दुर्गंधी येते, जी संपूर्ण किचनमध्ये पसरते. पण ही कठीण कामं आता अगदी सोपी होणार आहेत!(Kitchen Cleaning Hacks).
तवा, कढई किंवा प्रेशर कुकरवर साचलेला चिकट, तेलकट थर तासंतास घासून हात दुखण्यापेक्षा काही नैसर्गिक घटक वापरून, आपण ही घाण काही मिनिटांत साफ करू शकता. इतकंच नाही तर (easy hacks to clean burnt utensils) फ्रिजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आता जास्त (simple kitchen hacks for daily use) कष्ट घेण्याची गरज नाही. तुमची कामं निम्म्याने कमी करणाऱ्या आणि किचनला नवा लूक देणाऱ्या काही 'हॅक्स'बद्दल पाहूयात...
१. कुकर काळा झाला आहे? हा साधा हॅक ट्राय करा...
बटाटे उकळल्यानंतर किंवा डाळ-भात शिजवल्यानंतर अनेकदा कुकर आतून बराच काळा होतो. हे डाग इतके हट्टी असतात की घासूनही निघत नाहीत. अशा वेळी तुम्हाला फक्त अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि त्यावर चांगले मीठ लावून घ्यायचे. हे मिश्रण जळलेल्या काळ्याकुट्ट डागांवर नीट रगडा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या, त्यानंतर कुकर पुन्हा एकदा डिशवॉश लिक्विड किंवा साबणाने घासून स्वच्छ धुवून घ्या. यामुळे जळका प्रेशर कुकर अगदी नव्यासारखाच स्वच्छ होऊन चमकू लागतो.
रात्री-अपरात्री लागणारी भूक आता वाढवणार नाही वजन! मध्यरात्री खायचेच तर बिंधास्त खा ‘हे’ पदार्थ...
२. तव्यावर जळका काळपटपणा थर साचला आहे...
तव्यावर पोळ्या भाजल्यानंतर काही वेळातच त्यावर जळलेला काळपटपणा जमा होऊ लागतो. याला साफ करणे अशक्य वाटते पण ते खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त एक कांदा अर्धा कापून घ्यायचा आहे आणि तो तव्यावर चांगल्या प्रकारे रगडायचा आहे. थोडा वेळ तसेच राहू द्या आणि नंतर स्क्रबरच्या मदतीने धुवून घ्या, तवा एकदम स्वच्छ होईल.
२ कप रव्याच्या होतील १०० पाणीपुरीच्या पुऱ्या! पुरी फुगेल फुग्यासारखी टम्म, कुरकुरीत...
३. जळलेली कढई किंवा भांडी अशी करा साफ...
कढई किंवा एखादे भांडे जळाल्यामुळे काळे झाले असेल, तर ते घासूनही लवकर स्वच्छ होत नाही. अशावेळी स्वयंपाकघरातील बेकिंग सोडा फायदेशीर ठरु शकतो. जळकी कढई किंवा भांड्यात पाणी घेऊन ते चांगले गरम करा. त्यानंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे जळलेला काळपटपणा जास्त मेहनत न घेता सहज निघून जाईल. ३० ते ३५ मिनिटानंतर भांड साबण किंवा लिक्विड डिशवॉश लावून स्वच्छ धुवून घ्या.
४. फ्रिजची दुर्गंधी कशी दूर करावी?
फ्रिजमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ ठेवलेले असतात, त्यामुळे फ्रिजमध्ये दुर्गंधी येणे साहजिक आहे. म्हणून आठवड्यातून एकदा फ्रिजची स्वच्छता करणे गरजेचे असते. यासाठी जास्त कष्ट करण्याची गरज नाही; फक्त व्हाईट व्हिनेगर थोड्या पाण्यात मिक्स करून घ्या. या मिश्रणाने फ्रिज नीट पुसून घ्या, यामुळे फ्रिजमधील दुर्गंधी लगेच दूर होईल.
५. चाकूची धार कमी झाली आहे?
अनेकदा वारंवार वापरून चाकूची धार बोथट होते, ज्यामुळे भाज्या, फळे कापायला त्रास होतो आणि हात कापण्याची भीतीही वाढते. अशावेळी घरात अगदी सहज उपलब्ध असलेला एखादा जुना कप किंवा कॉफी मग घ्या आणि त्याच्या उलट्या म्हणजेच पृष्ठभागावर चाकू घासा. चाकू पुन्हा धारदार होईल.
