lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > कियाराच्या आईने लाडक्या लेकीसाठी केले खास सिंधी पदार्थ, कियारा इमोशनल होत म्हणाली...

कियाराच्या आईने लाडक्या लेकीसाठी केले खास सिंधी पदार्थ, कियारा इमोशनल होत म्हणाली...

Kiara Advani Enjoys Delicious Homemade Sindhi Food, Courtesy Her Mother : कियारा अडवाणीने तिच्या आईच्या हातच्या बनलेल्या यम्मी सिंधी फूडचा एक झकास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करुन आईच्या हातच्या जेवणाची झलक शेअर केली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2023 06:56 PM2023-10-03T18:56:07+5:302023-10-03T19:10:00+5:30

Kiara Advani Enjoys Delicious Homemade Sindhi Food, Courtesy Her Mother : कियारा अडवाणीने तिच्या आईच्या हातच्या बनलेल्या यम्मी सिंधी फूडचा एक झकास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करुन आईच्या हातच्या जेवणाची झलक शेअर केली...

Kiara Advani enjoys Sindhi food made by 'mama', Kiara Advani's day is made as she relishes Sindhi food made by 'mama' | कियाराच्या आईने लाडक्या लेकीसाठी केले खास सिंधी पदार्थ, कियारा इमोशनल होत म्हणाली...

कियाराच्या आईने लाडक्या लेकीसाठी केले खास सिंधी पदार्थ, कियारा इमोशनल होत म्हणाली...

प्रत्येक मुलीला आपल्या आईच्या हातचे जेवण फारच प्रिय असते. कोणत्याही मुलीला कितीही मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल मधील फेमस डिश जरी आणून दिली तरी तिला आईने केलेला स्वयंपाकचं आवडतो. लग्न झालेल्या मुलींच्या बाबतीत तर ही बाब प्रकर्षाने जाणवतेच. माहेरी असताना आपल्या आवडीच्या पदार्थांची फर्माईश आईकडे केली की आई ताटात तो पदार्थ बनवून ठेवणार हे नक्कीच. आईकडे असताना तिच्या बनवलेल्या पदार्थाचे कधी कौतुक केले जाते तर कधी नाकं मुरडून नाव ठेवून आपण मोकळे होतो. परंतु सासरी गेल्यावर जेव्हा एखाद्या मुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येते तेव्हा तिला खरी आईची किंमत कळते. तेव्हा खरी आईच्या हातच्या जेवणाची आठवण रोज येत राहते. अशी परिस्थिती एखाद्या सर्वसामान्य मुलीचीच नाही तर मोठमोठ्या सेलिब्रिटींची देखील होते(Kiara Advani relishes ‘mama’s home food’ comprising Sindhi specialities).

नुकतेच लग्न होऊन सासरी गेलेली सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हिच्यासोबत असेच काहीसे घडल्याचे दिसत आहे. हल्लीच कियाराने (Kiara Advani) आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून (Kiara Advani enjoys Sindhi food made by 'mama') आईच्या जेवणाचे कौतुक करणारी (Kiara Advani relishes ‘mama’s home food’ comprising Sindhi specialities) पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ("Sometimes all you really need..." Kiara Advani relishes Sindhi meal cooked by her mom) कियाराने आई जेनेव्हिव्ह जाफरी - अडवाणी यांच्या स्वादिष्ट स्वयंपाकाबद्दल मनभरून कौतुक केल्याचे दिसत आहे. ही खास पोस्ट शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना स्वादिष्ट सिंधी खाद्यपदार्थांची एक झलक दाखवली आहे. यासोबतच आपल्याला घरी बनवलेले पदार्थ खायला भरपूर आवडतात याची कबुली दिली आहे(Kiara Advani Enjoys Delicious Homemade Sindhi Food, Courtesy Her Mother).

कियाराने भरभरुन केले आईच्या हातच्या पदार्थांचे कौतुक...

कियारा अडवाणीने तिच्या Instagram अकाऊंटवर तिच्या आईने तयार केलेल्या स्वादिष्ट सिंधी जेवणाचा फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये कियाराच्या आईने घरी तयार केलेले काही खास सिंधी पदार्थ एका प्लेटमध्ये सजवलेले दिसत आहेत. या प्लेटमध्ये शिजवलेला भात त्यावर सिंधी कढी, आलू टुक सोबत तोंडी लावायला म्हणून भेंडी फ्राय असा खास सिंधी पद्धतीचा मेन्यू दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "कधी कधी तुम्हाला फक्त आईच्या हातच्या जेवणाची गरज असते."  या कॅप्शनसोबतच तिने आईच्या जेवणाबद्दल प्रेम व्यक्त करणारा इमोजी व हार्ट दाखवले आहेत. 

नेलपेंट इतकी महाग की त्या पैशात येतील ३ मर्सिडीज कार, ही नेलपेंट इतकी महाग का ?

मोठ्ठा काळा फुटबॉल बनून रॅम्पवर आली मॉडेल, चालता चालता हरवली इतकी बिथरली की...

कियाराचा नवरा सिद्धार्थसाठी खास रेसिपी बनवण्याचा किस्सा व्हायरल... 

काही दिवसांपूर्वीच कियाराने अटारी बॉर्डवर जवानांची भेट घेतली. तिथे तिने लोकांना आपला ऑटोग्राफ दिला, त्यांच्यासोबत झेंडा फडकवला. तेव्हा तिथे काही कार्यक्रमही आयोजित केले होते. त्या कार्यक्रमात एका जवानाने अभिनेत्रीला तिच्या स्वयंपाक कौशल्याबद्दल प्रश्न विचारला. यावर कियारानेही मजेशीर उत्तर दिले. खरं तर, 'NDTV'च्या 'जय जवान' शोदरम्यान कियारा अडवाणीला एक प्रश्न विचारण्यात आला की, 'लग्नानंतर तू तुझ्या स्वयंपाकघरात बनवलेली पहिली रेसिपी कोणती होती?' हे ऐकून कियारा अडवाणी आधी किंचित हसली आणि मग म्हणाली, 'मी आतापर्यंत काहीही बनवले नाही. एकदा पाणी गरम केले असावे. तिने स्वतःला भाग्यवानही म्हटले आणि सांगितले की सिद्धार्थ खूप चांगला स्वयंपाक बनवतो.

Web Title: Kiara Advani enjoys Sindhi food made by 'mama', Kiara Advani's day is made as she relishes Sindhi food made by 'mama'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.