Join us  

महिलांनीच का करावं घरातलं काम? आता सरकारच देणार पुरूषांना स्वयंपाक अन् साफसफाईचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 1:12 PM

kerala govt cooking class for boys men gender equality : लिंग समानता सुनिश्चित करण्यासाठी स्मार्ट किचन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

सध्या घरातील पुरूष आणि बायका दोन्ही कामासाठी बाहेर जात असल्या तरी महिलांनीच घरातील कामं करावीत, साफसफाईकडे लक्ष द्यावं, घर नीटनेटकं ठेवावं असं अनेकांना वाटतं. याच कारणावरून अनेक घरांमध्ये वादही झालेले पाहायला मिळतात. घरच्या कामांना मदत करण्यासाठी सगळेच उत्साही असतात असं नाही. केरळमध्ये महिला व बालकल्याण विभागातर्फे पुरुष आणि मुलांसाठी विशेष प्रात्यक्षिक वर्ग घेण्यात येणार आहेत. यात  पुरूषांना स्वयंपाक, साफसफाईची कामं शिकवण्यासह घरगुती जबाबदारी समजावून सांगितल्या जातील. (kerala govt cooking class for boys men gender equality)

लिंग समानता सुनिश्चित करण्यासाठी स्मार्ट किचन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. स्वयंपाक तज्ज्ञांकडून हे प्रशिक्षण वर्ग घेतले जातील. यात पुरूषांचा स्वयंपाकातील रस वाढवण्यासाठी मार्गदर्शन, आणि प्रात्यक्षिक केले जातील. घरातील भांडी खरेदीसाठी बिनव्याजी कर्जाचे वाटप पतीच्या नावे संयुक्तपणे केले जाईल. या प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविला जात असला तरी काम मात्र सुसंगतच होणार आहे.

एका समितीद्वारे हे आयोजन केलं जाईल ज्यामध्ये मुख्य सचिव अध्यक्ष आणि प्रतिनिधी असतील. यांच्या नेतृत्वाखालील समितीनंतर राज्य सरकार प्रकल्पाबाबत अंतिम आदेश जारी करेल. मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विविध सुधारणांसह कृती आराखड्याच्या मसुद्याला मंजुरी दिली जाईल.

केरळ स्टेट फायनान्शियल एंटरप्राइझ (KSFE) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी  बिनव्याजी कर्ज मंजूर करणे मागासवर्गीय कुटुंबांना स्मार्ट किचन कार्यक्रमाचा भाग म्हणून घरगुती भांडी खरेदी मोफत या सेवा प्रदान करत आहे. आदिवासी वसाहतींमध्ये महिला आणि पुरुष दोघांच्या सहभागाने सामुदायिक स्वयंपाकघरे उघडणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग खुले करणे असे अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. 

टॅग्स :केरळसोशल व्हायरलसोशल मीडिया