अभिनेत्री कंगना रानौत एक खासदार म्हणून जेव्हा जेव्हा संसदेत जाते तेव्हा तिने केलेला पेहराव त्या पदाला अतिशय शोभून दिसणारा असतो. तिच्या साड्यांचं कलेक्शनही खूप खास असतं आणि तिच्याकडे पाहून खरोखरच ती एक लेडी बॉस असल्यासारखी वाटते. आता पश्चिम बंगाल येथे झालेल्या एका प्रचारसभेला कंगनाने नुकतीच हजेरी लावली. यावेळी तिने पांढऱ्याशुभ्र रंगाची साडी नेसली होती. ही साडी तिने यापुर्वीही एकदा नेसली आहे. पण यावेळी मात्र तिच्या साडीची खूपच चर्चा रंगली आहे आणि एक वेगळाच वाद त्यामुळे निर्माण झाला आहे.
कंगना रानौतच्या पांढऱ्या साडीमुळे अनेकांना पडला प्रश्न
कंगनाची जी साडी सध्या प्रचंड चर्चेत आहे ती साडी ऑर्गेंझा सिल्क प्रकारातली आहे. शिवाय ती पारंपरिक जमदानी वर्कची आहे. जमदानी विणकाम कला ही अतिशय क्लिष्ट मानली जाते. यामध्ये बारीक सुई वापरून साडीवर विणकाम करतात. त्यात प्रामुख्याने सुती धागा वापरला जातो. या धाग्याला आधी स्टाई केले जाते आणि त्यानंतर तो विणला जातो. आडवे धागे वापरून नक्षीकाम केलं जातं. कंगनाची साडीही त्याच प्रकारातली आहे. आता या साडीवरून निर्माण झालेला वाद असा की ती साडी पॉवरलूम आहे की हॅण्डलूम आहे.. पॉवरलूम साड्यांसाठी मशिनचा वापर केला जातो आणि त्या कमी वेळेत तयार होतात. त्यांची किंमतही कमी असते.
पण हॅण्डलूम साडी मात्र हातानेच तयार केली जाते आणि तिला भरपूर वेळ आणि मेहनत लागत असल्याने तिची किंमतही जास्त असते. आता कंगानाची साडीही पूर्णपणे हॅण्डलूम असून तिच्यावर अतिशय उच्च दर्जाचे जमदानी विणकाम केलेले आहे.
Summer Care: भरपूर पाणी पिता; पण तरीही डिहायड्रेशन होतंय, शरीरातली उष्णता वाढतेय सांगणारी ४ लक्षणं
कोलकाता येथील यार्न या ब्रॅण्डची ही साडी असून तिची किंमत तब्बल ८५ हजार रुपये एवढी आहे. यावरूनच ती साडी किती विशेष आहे हे लक्षात येते. साडीप्रेमींनी या साडीवर भरपूर चर्चा केली आणि आपापले अंदाज बांधले. त्यानिमित्ताने भरपूर चर्चाही झाली.
Web Summary : Kangana Ranaut's white Jamdani saree, worn at a West Bengal rally, sparked debate over whether it was powerloom or handloom. The saree, from Kolkata's Yarn Story, costs ₹85,000.
Web Summary : कंगना रनौत की सफेद जामदानी साड़ी, जो पश्चिम बंगाल रैली में पहनी गई थी, इस बात पर विवाद छिड़ गया कि यह पावरलूम है या हैंडलूम। कोलकाता के यार्न स्टोरी की इस साड़ी की कीमत ₹85,000 है।