आपल्या स्वयंपाक घरात वेगवेगळ्या प्रकारची अनेक भांडी असली तरी त्यातील काही मोजक्याच भांड्यांचा वापर नेहमी केला जातो. रोजच्या वापरातील कढई, पॅन किंवा तवा वरून चकचकीत दिसत असले, तरी त्यांच्या हँडलजवळचा भाग हळूहळू तेलकट आणि काळवंडलेला दिसू लागतो. हँडल आणि मुख्य भांडे जिथे हॅण्डलला जोडलेले असते, त्या फटींमध्ये तेल आणि अन्नाचे कण साचून एक हट्टी काळा थर जमा होतो. रोजच्या साध्या साबणाने किंवा लिक्विडने हा भाग घासूनही निघत नाही, उलट तो अधिक चिकट आणि कठीण होत जातो. गॅसची आंच, तेलाचे थेंब आणि धुरामुळे हा भाग इतका मळलेला दिसतो की साध्या धुण्याने तो स्वच्छ होत नाही(remove black layer from kadai handle without scrubbing).
अनेकदा कितीही घासले तरी काळेपणा जात नाही आणि भांडी जुनी व अस्वच्छ वाटू लागतात. अशावेळी ही भांडी दिसायला तर खराब दिसतातच, पण स्वच्छतेच्या दृष्टीनेही ते योग्य नसते. आपण अनेकदा ही कढई, पॅन किंवा तवा घासणीने खूप घासून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही केल्या हे भांड्यांच्या हँडलजवळचे काळेकुट्ट डाग जाता जात नाहीत... परंतु यासाठी महागडी केमिकल क्लिनर वापरण्याची गरज नाही. आपल्या घरातच सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या मदतीने हा हट्टी काळेपणा सहज काढता येतो. एका खास सोप्या ट्रिकच्या मदतीने कढई, पॅन आणि तवा यांच्या (how to clean kadai and remove black layer from handle) हॅण्डलजवळचा भाग चमकदार आणि स्वच्छ करू शकता.
कढई, पॅन आणि तवा यांच्या हॅण्डलजवळचा काळाकुट्ट भाग चमकदार व स्वच्छ करण्यासाठी...
सर्वात आधी एक अशी मोठी कढई किंवा पातेले घ्या ज्यामध्ये तुमची घाण झालेली छोटी कढई पूर्णपणे बुडेल. त्यामध्ये ३ ते४ ग्लास पाणी ओता. या पद्धतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, जेव्हा तुम्ही मोठ्या कढईत पाणी उकळता, तेव्हा ती मोठी कढई सुद्धा आतून स्वच्छ होऊ लागते. अशा प्रकारे एकाच मेहनतीत तुमच्या दोन कढया एकाच वेळी नव्यासारख्या चमकू लागतील.
उकळत्या पाण्यात एक चमचा मीठ आणि लिंबाचा रस घाला. मीठ स्क्रबिंगचे काम करते, तर लिंबातील ॲसिडिक गुणधर्म कढईवरील चिकटपणा आणि तेलकट थर काढून टाकण्यास मदत करतात. जर तुमच्याकडे लिंबू नसेल, तर तुम्ही एक ते दीड चमचा व्हाईट व्हिनेगर (White Vinegar) देखील टाकू शकता. या दोन्ही गोष्टी भांड्यांची चमक परत मिळवून देण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
आता या द्रावणात एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडे डिश वॉश लिक्विड मिसळा. जसा तुम्ही सोडा टाकाल, तसा पाण्यात फेस तयार होईल. यामुळे कढईच्या हँडलवर आणि कोपऱ्यांत साचलेली कडक घाण फुगू लागेल आणि मऊ होईल. डिश वॉश लिक्विड चिकटपणा पाण्यात विरघळवण्यास मदत करते, ज्यामुळे कढईच्या पृष्ठभागावरील थर सहज निघण्यास सुरुवात होते.
तयार केलेल्या द्रावणात तुमची घाण झालेली छोटी कढई टाका. लक्षात ठेवा की कढईचा बाहेरील भाग आणि हँडल पाण्यात पूर्णपणे बुडलेले असावे. आता पाणी मोठ्या आचेवर उकळू द्या. उकळत्या पाण्याचा गरमपणा आणि नैसर्गिक 'क्लीनिंग एजेंट्स' एकत्र मिळून कढईवरील घाणीचे कडक थर सैल करतात. थोडा वेळ पाणी उकळल्यानंतर तुम्हाला दिसेल की कढईवरील घाण सुटून पाण्यात तरंगू लागली आहे.
आई गं! ड्रिल मशीन वापरुन केला सरसो का साग, पाहा पंजाबी भाजीचा व्हायरल भन्नाट व्हिडिओ...
जेव्हा कढई चांगली उकळली जाईल, तेव्हा ती काळजीपूर्वक बाहेर काढा. आता कढईवर थोडे लिक्विड डिशवॉश लावा आणि तारेच्या घासणीच्या मदतीने घासून घ्या. कढई, पॅन किंवा तव्यावरील घाण आधीच सैल झालेली असते, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त ताकद लावण्याची गरज पडणार नाही. अवघ्या काही मिनिटांतच कढईचे हँडल आणि मागील भाग नव्यासारखा चमकू लागेल.
जर कढई अनेक वर्षे जुनी असेल आणि त्यावर घाणीचे खूप जाड थर साचले असतील, तर उकळत्या पाण्यात तुम्ही अर्धा चमचा कॉस्टिक सोडा टाकू शकता. कॉस्टिक सोडा अत्यंत शक्तिशाली असतो आणि तो कितीही कडक काळपट थर किंवा जळकट डाग सहज काढून टाकतो. मात्र, कॉस्टिक सोड्याचा वापर करताना सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. भांडी घासताना हातांत हातमोजे नक्की घाला, जेणेकरून तुमच्या त्वचेला कोणतीही इजा पोहोचणार नाही.
