Lokmat Sakhi >Social Viral > जास्वंदाचे फूल म्हणजे केस आणि त्वचेसाठी वरदान, पाहा फूल एक फायदे अनेक

जास्वंदाचे फूल म्हणजे केस आणि त्वचेसाठी वरदान, पाहा फूल एक फायदे अनेक

Jasmine Flower Is A Boon For Hair And Skin : जास्वंदाचे फुल शरीरासाठी फार फायदेशईर आहे. जाणून घ्या फायदे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 19:49 IST2025-01-23T19:46:47+5:302025-01-23T19:49:56+5:30

Jasmine Flower Is A Boon For Hair And Skin : जास्वंदाचे फुल शरीरासाठी फार फायदेशईर आहे. जाणून घ्या फायदे.

Jasmine Flower Is A Boon For Hair And Skin | जास्वंदाचे फूल म्हणजे केस आणि त्वचेसाठी वरदान, पाहा फूल एक फायदे अनेक

जास्वंदाचे फूल म्हणजे केस आणि त्वचेसाठी वरदान, पाहा फूल एक फायदे अनेक

गणपती बाप्पााला वाहायला म्हणून आपण जास्वंद वापरतो. गणेशाचे आवडते फुल म्हणून विविध विधींमध्ये जास्वंद वापरले जाते. (Jasmine Flower Is A Boon For Hair And Skin) पण जास्वंदीचा वापर फक्त धार्मिक कार्यांपुर्ता मर्यादित नाही. त्याचे अजूनही अलेक फायदे आहेत. जे आपल्याला माहितीच नाहीत. आयुर्वेदात जास्वंदाच्या झाडाला फार महत्त्व आहे. (Jasmine Flower Is A Boon For Hair And Skin)आयुर्वेदात जास्वंदाच्या फुलाचे तसेच पानाचे अनेक फायदे सांगितले आहेत. गावाकडच्या बाजूला प्रत्येक घरापाशी जास्वंदाचे झाड दिसते. अंगणातील प्रसन्नता हे झाड जपते असं गावकरी म्हणतात. त्याचे विविध वापरही करतात.   

जास्वंदाच्या फूलात प्रथिने असतात. कॅल्शियम असते. तसेच मोठ्या प्रमाणात लोह असते. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात. अजूनही अनेक गुणधर्म जास्वंदाच्या फुलात असतात.

जास्वंदाचे तेल तसेच शॅम्पू बाजारात विकत मिळतो. केसांच्या आरोग्यासाठी जास्वंदाची फुले व पाने फार फायदेशीर असतात. विकतचे तेल किंवा शॅम्पू वापरण्यापेक्षा घरीच जास्वंदाचे फुल व पाने उकळा. त्याचे पाणी केसाला लावा ते जास्त फायदेशीर असते. (Jasmine Flower Is A Boon For Hair And Skin)

त्वचेसाठी उपयुक्त असणारी पोषकतत्वे जास्वंदीच्या पाना-फुलात असतात. त्वचेला फुलाचा रस लावणे चांगले असते.  त्वचा जर कोरडी पडत असेल तर, तिला पोषण देण्याचे काम जास्वंदाचे फुल करते. 

रंग तयार करण्यासाठीही जास्वंदाच्या फुलाचा वापर केला जातो. नैसर्गिक लाल रंग तयार करण्यासाठी जास्वंदाचे फुल वापरले जाते.   

काही ठिकाणी जास्वंदाचा चहा पिण्याची पद्धत आहे. हा चहा शरीरासाठी पौष्टिक असतो. जास्वंदीचा चहा वजन कमी करण्याच्या हेतूने प्यायला जातो. तोंडात उष्णतेचे फोड आल्यावर जास्वंदाचं पान किंवा फुल चावल्याने ते जाते. तसेच मधुमेहाचा त्रास असणार्‍यांसाठीही हा चहा चांगला. रक्तदाब व्यवस्थित ठेवण्यासाठीही जास्वंदाचा चहा उपयुक्त आहे. 

जास्वंदाचे हे वापर जर तुम्ही करत नसाल तर नक्की करा. जास्वंदाचे फुलचं नाही तर त्याचे पानही पौष्टिक असते. म्हणून आपले पूर्वज घरापुढे जास्वंदाचं झाड लावायचा सल्ला द्यायचे.
 

Web Title: Jasmine Flower Is A Boon For Hair And Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.