Join us

मतदानासाठी जाताना जान्हवी कपूरने घातलेल्या ओढणीची व्हायरल चर्चा, त्या दुपट्ट्यावर पाहा काय लिहिलंय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:55 IST

Janhvi Kapoor's Trending Dupatta : जान्हवी कपूर मतदानासाठी गेली असताना कॅमेरात स्पॉट झाली. ज्या ठिकाणी तिच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

जान्हवी कपूरचा अपकमिंग चित्रपट मिस्टर एंडी मिसेस माही चे प्रमोशन जोरदार करत आहे. राजकुमार रावा आणि जान्हवी कपूर या चित्रपटावरून लोकांमध्ये बरेच चर्चेत आहेत. या चित्रपटाची स्टार कास्ट जोरदार प्रमोशनच्या प्रयत्नात आहे.  (Janhvi Kapoor's Trending Dupatta ) जान्हवी कपूर मतदानासाठी गेली असताना कॅमेरात स्पॉट झाली. ज्या ठिकाणी तिच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिने स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यात कसलीही कसर सोडली नाही. आता

कपूरने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले आहे. मतदानाच्या दिवशी, अभिनेत्री गुलाबी-किरमिजी रंगाचा जयपुरी प्रिंटेड अनारकली सूट परिधान करून मतदानासाठी आली होती. यावेळी तिच्या ड्रेसवर काय लिहिले होते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटातील देखा तेनू हे पहिले गाणे रिलीज झाले असून लोकांना हे गाणे खूप आवडत आहे. सोशल मीडियावर तिच्या दुपट्ट्यावर लिहिलेल्या गोष्टींमुळे ही अभिनेत्री चर्चेत असते.

मतदानासाठी आलेली जान्हवी तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचे प्रमोशन अगदी वेगळ्या अंदाजात करत आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशीही अभिनेत्रीने आपल्या चित्रपटाचे खास प्रमोशन केले आहे. तिने कस्टमाइज्ड दुपट्टा घातला होता, त्यावर असे काही लिहिले की सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय बनला. तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या 'देखा तेनू' या चित्रपटातील पहिले गाणे दुपट्ट्यावर लिहिले होते. अभिनेत्रीची ही शैली लोकांना खूप आवडते.

चेहरा आणि मानेवरही काळा थर? प्रियांका चोप्राचं ब्यूटी सिक्रेट बॉडी स्क्रब चेहऱ्याला लावा, ग्लो येईल

'मिस्टर अँड मिसेस माही' धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही' मधील पहिल्या गाण्याचे नाव 'देखा तेणू' आहे, ज्यामध्ये दोघांची सुंदर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सखरेदीजान्हवी कपूर