रोजच्या वापराच्या वस्तू खराब झाल्या की काम अगदी मंदावून जाते. नवीन वस्तू आणायचे म्हणजे हाताला त्यांची सवय व्हायला वेळ लागतो. उगाचच खर्चही नको वाटतो. (Is the knife not as sharp as before? Then sharpen it in two minutes)रोजच्या वापराची भांडी आपण अगदी छान स्वच्छ करुन ठेवतो. मात्र काही वस्तू आहेत ज्या फक्त स्वच्छ करून चालत नाही. तर त्यांची व्यवस्थित काळजीही घ्यावी लागते. जसे की चिरण्यासाठी वापरली जाणारी सुरी किंवा चाकू. काही कापायचे असेल तर वापरायची कात्री. या आपल्या रोजच्या वापराच्या वस्तू आहेत. बरेचदा त्यांची धार निघून जाते. (Is the knife not as sharp as before? Then sharpen it in two minutes)साधी भाजी चिरायलाही फार जोर लावावा लागतो. तरी नीट चिरले जात नाही. सुरीला धार काढण्यासाठी यंत्र मिळते, मात्र ते प्रत्येकाच्या घरी असतेच असे नाही. अगदी सोपे उपाय करून या वस्तूंना पुन्हा धारदार काढता येते. पाहा काय कराल.
१. सुरीला धार काढण्यासाठी एक सेरेमिकचा कप वापरा. घरी शक्यतो असा कप असतोच. गॅस चालू करा आणि सुरी दोन्ही बाजूंनी गॅसवर जरा तापवून घ्या. फक्त २ ते ३ मिनिटांसाठी सुरी तापवून झाली की मग कप उलटा ठेवा आणि कपाच्या बेसला जी कडा असते त्या कडेवर सुरी घासा. सुरीची दोन्ही टोके घासा आणि मग थोड्या वेळाने सुरी वापरुन बघा. मस्त धारदार होते. हीच पद्धत वापरून कात्री किंवा इतर धारदार वस्तूंनाही धार काढता येते.
२. बोल्ट नटचा वापर करुनही धार काढता येते. सुरी गॅसवर काही मिनिटांसाठी तापवून घ्या. नंतर जरा जाडसर मोठा बोल्ट नट घ्या. नट अगदी वरपर्यंत फिरवून बंद करा. फक्त थोडीशी गॅप ठेवा. नंतर सुरीचा जो भाग आपण चिरण्यासाठी वापरतो तो भाग बोल्टची वरची बाजू व नट यांच्यामध्ये घासा. व्यवस्थित ४ ते ५ मिनिटे घासा. नंतर वापरुन बघा मस्त धार होते.
दोन्ही पद्धतींचा वापर करुन बघा. करायला अगदीच सोप्या आहेत आणि सुरीला धारही खुप छान होते. नवीन वस्तू आणायची गरज पडणार नाही. तसेच पुन्हा धार गेली तर सेम प्रोसेस परत करायची.