कमीत कमी वेळेत स्वयंपाक कसा करता येईल असा प्रश्न गृहिणींसमोर रोजचा असतो. त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाचे नियोजन हे दिवसाच्या सुरुवातीपासूनच सुरु होते. (is cooking in pressure cooker healthy) वेळ आणि गॅसची बचत करण्यासाठी स्वयंपाकघरात कुकरचा वापर केला जातो. स्वयंपाकघरातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेशर कुकर. (pressure cooker destroy nutrients) प्रत्येक स्वयंपाकघरात याचा सरार्स वापर केला जातो. ज्यामुळे आपली कामं सोपी होतात आणि वेळही वाचतो. जर तुमच्याकडे प्रेशर कुकर नसेलच तर जेवण बनवणे किती अवघड होईल याची कल्पना देखील करणे कठीण होईल. अनेकदा अॅल्युमिनियम आणि स्टील कुकर यापैकी कोणता कुकर निवडावा हा प्रश्न गृहिणींच्या समोर असतो.
बाजारात प्रेशर कुकरचे अनेक नवीन प्रकार आले आहेत. ज्यामुळे जेवण अधिक काळ गरम राहाते किंवा पदार्थ लगेच शिजतो. परंतु, अनेकांना असे वाटते की, प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवल्याने पोषक तत्व नष्ट होतात. त्यामुळे ते पातेल किंवा भांड्यात जेवण बनवणे पसंत करतात. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवल्याने पोषक तत्व नष्ट होतात का? याबद्दल जाणून घेऊया फिटनेस कोच राल्स्टन डिसोझा यांच्याकडून.
प्रेशर कुकर की, पातेल रॅल्स्टन यांच्या मते , प्रेशर कुकर हे पातेल्यात केलेल्या स्वयंपाकापेक्षा जास्त चांगले आहे. यामुळे अन्नातील पोषक तत्व नष्ट होत नाही. प्रेशर कुकरला सीलबंद झाकण असते. ज्यामध्ये पाणी उकळून त्याचा वाफेत बदल होतो. हे पाणी कुकरमधून बाहेर पडत नाही, ज्यामुळे भांड्यातील दाब वाढतो. हे जास्त बाष्पीभवन होण्यापासून रोखते, ज्यामुळे ते १०० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक प्रमाणात द्रव स्वरुपात तापमान तयार करते. यामुळे अन्नपदार्थ लवकर शिजण्यास मदत करतात.
स्वयंपाक करण्याची सगळ्यात चांगली पद्धत कोणती?
स्वयंपाक करताना सगळ्यात कमी तापमानाची आवश्यकता असते. कुकरमध्ये वाफवणे किंवा उकळवणारे पदार्थ बनवले जातात. या दोन्ही पद्धती उत्तम आहेत ज्यामुळे अन्नातील पोषक घटक नष्ट होत नाही. प्रेशर कुकरमध्ये आपण या दोन्ही पदार्थांपैकी कोणत्याही गोष्टी करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
स्वयंपाक करण्याचा सर्वात सोपा मार्ग आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की, डीप-फ्रायिंग हा अन्न शिजवण्यासाठी सर्वात वाईट मार्ग आहे. परंतु, पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्या मते तळणं, ग्रिलिंग आणि मायक्रोवेव्हिंग करणं देखील टाळायला हवं. यापैकी कोणत्याही पदार्थांचा वापर केल्याने रसायनांच्या संपर्कात आपण येऊ शकतो. ज्यामुळे शरीरात हानिकारक संयुगे तयार होऊ शकतात किंवा ट्रान्स फॅट्स तयार होतील. स्वयंपाक करण्यासाठी या पद्धतीचा कधी तरी उपयोग करणं चांगले असते. परंतु, नियमितपणे याचा वापर करणे टाळायला हवे.