Scam Viral Post : परदेशात फिरायला जायचं म्हटलं की, थायलॅंडचं नाव सगळ्यात आधी समोर येतं. भारतातील भरपूर लोक येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जातात. असं म्हणुया की, थायलॅंड हे भारतीयांचं आवडतं पर्यटनस्थळ आहे. पण अलीकडेच इथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. थायलॅंडच्या क्राबी येथे एक अजब स्कॅम उघडकीस आला आहे. फुकेतमध्ये विकत घेतलेल्या अजब गमीज खाल्ल्यानंतर एक भारतीय पर्यटक गंभीररीत्या आजारी पडली. तब्येत बिघडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये तिला तीन IV ड्रिपसाठी तब्बल 1 लाख रुपये बिल लावलं. तिने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये मोनिका गुप्ता या भारतीय तरूणीने सांगितल की तिची आणि तिच्या एका मैत्रिणीची दुपारी साधारण २ वाजता तब्येत बिघडू लागली होती. त्यांना विचित्र लक्षणं जाणवत होती. छातीत जडपणा, श्वास घेण्यास त्रास इत्यादी. फक्त 15 मिनिटांत तिच्या मैत्रिणीला 20 वेळा उलटी केल्या. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तात्काळ एका स्थानिक हॉस्पिटलला फोन केला. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच दोघींनाही IV ड्रिप लावण्यात आली, आणि त्या जवळपास 30 मिनिटे बेशुद्ध राहिल्या.
फ्लाइट चुकली
सुरुवातीला उपचारासाठी त्यांना 48,000 रुपयांचा बिल देण्यात आलं. पण ते तासन्तास झोपून राहिल्यामुळे त्यांची फ्लाइट मिस झाली. नंतर जागे झाल्यानंतर जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये बिल भरण्यासाठी परत आल्या तेव्हा त्यांच्याकडून 1 लाख रुपये आकारले गेले. त्यांच्या मते, हा प्रकार काही थाई हॉस्पिटल आणि या गमीज विकणाऱ्या लोकांचा एक ऑर्गनाइज्ड स्कॅम असू शकतो, जो अनोळखी पर्यटकांना लक्ष्य करतो.
यूजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. एकाने लिहिले की, 'वाईट अनुभव येऊ शकतात, पण माझ्यासाठी थायलॅंड नेहमीच चांगला ठरला'. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'माझ्यासोबतही असा प्रकार घडला आहे'. एका युजरने सावध करत लिहिले की, 'मेडिकल इमरजन्सी, फ्लाइट कॅन्सल, प्रवासातील अडचणी यासाठी नेहमी ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्या'. एका थाई युजरने सांगितले की, “थायलंडमध्ये सरकारी आणि प्रायव्हेट दोन्ही हॉस्पिटल आहेत. प्रायव्हेट उपचार महाग असतात. लोकल लोक इन्शुरन्स घेतात, पण टुरिस्टकडे इन्शुरन्स नसल्यास पूर्ण रक्कम आकारली जाते.”
