Join us  

माझा भाऊ कुठे दिसला तर कळवा! पोलीस महिलेचा व्हायरल व्हिडिओ, शोधतेय अपंग भावाला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 4:38 PM

‘If you see my brother, let me know’, a video of a female policeman goes viral 'वेड्या बहिणीची वेडी ही माया' कोणे एकेकाळी अपंग - गरीब तरुणाला तिने राखी बांधली होती आता पोलीस झाल्यावर घेते आहे त्याचा शोध

राखी पौर्णिमा हा सण संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. राखी बांधण्यासाठी बहिणी उत्सुक असतात. या सणामुळे अगदी मिठाईच्या दुकानांपासून ते विविध प्रकारच्या गिफ्ट दुकानांपर्यंत, संपूर्ण बाजारपेठ गजबजून जाते. सध्या लोकांचे विचार बदलत चालले आहे. ज्यांना भाऊ नाही ते आपले रक्षण करणाऱ्यांना राखी बांधून हा सण साजरा करीत आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला पोलीस कर्मचारी एका अपंग गरिबाला राखी बांधत आहे. हा व्हिडिओ तसा मागच्या वर्षीचा आहे.

मात्र, या वर्षी पुन्हा तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. कारण ती या व्हिडिओद्वारे आपल्या भावाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहे. यावर्षी सुद्धा ती आपल्या या भावाला राखी बांधण्यासाठी त्याची वाट पाहात आहे(‘If you see my brother, let me know’, a video of a female policeman goes viral).

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशमधील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं काही वर्षांपूर्वी, एका तरुणाला राखी बांधली होती. त्यावेळेस ती कानपूरमध्ये ट्रेनिंग घेत होती. दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका अपंग तरुणाला रक्षा बंधनाच्या निमित्तानं तिनं राखी बांधली होती. मुख्य म्हणजे, त्या गरीब अपंग तरुणानं ओवाळणी म्हणून आपल्याकडील काही पैसे देऊ केले. पण ते पैसे घेण्यास पोलीस महिलेने नकार दिला.

'डिजिटल इंडिया' - रक्षा बंधनासाठी खास क्युआर कोड मेहेंदी, भावाकडून पैसे घेण्याची हटके टेक्निक

हा व्हिडिओ त्यावेळेस फार व्हायरल झाला होता. त्यानंतर तो काही तिला सापडलेला नाही. यंदाच्या वर्षी त्याला शोधण्यासाठी तिनं तो जुना व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तरी किमान त्याचा पत्ता तिला कोणीतरी कळवेल, अशी तिला भाबडी आशा आहे.

व्हिडिओ पाहून युजर्स झाले भावूक

लेकीला सहावीत गणितात मिळाले १५ पैकी शून्य मार्क; आई म्हणाली शाबास बाळा..

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण व्हिडिओमधला तरुण हा अपंग असून, खूप गरीब दिसत आहे. पोलीस महिलेने केलेल्या कामाचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :उत्तर प्रदेशकानपूर पोलीसमहिलारक्षाबंधनसोशल मीडियासोशल व्हायरल