Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > कोणाला तुमचा राग येतोय, कोण तुमच्यावर जळतंय हे १ मिनिटात ओळखा, बघा सोप्या ट्रिक्स

कोणाला तुमचा राग येतोय, कोण तुमच्यावर जळतंय हे १ मिनिटात ओळखा, बघा सोप्या ट्रिक्स

समोरच्या माणसाचं जर काही गोष्टीत निरिक्षण केलं तर त्याला आपला राग येतो आहे का, तो आपल्यावर जळतोय का हे अगदी चटकन ओळखता येतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2026 09:40 IST2026-04-12T09:37:12+5:302026-04-12T09:40:01+5:30

समोरच्या माणसाचं जर काही गोष्टीत निरिक्षण केलं तर त्याला आपला राग येतो आहे का, तो आपल्यावर जळतोय का हे अगदी चटकन ओळखता येतं...

Identify who is angry with you, who is jealous of you in 1 minute, see simple tricks | कोणाला तुमचा राग येतोय, कोण तुमच्यावर जळतंय हे १ मिनिटात ओळखा, बघा सोप्या ट्रिक्स

कोणाला तुमचा राग येतोय, कोण तुमच्यावर जळतंय हे १ मिनिटात ओळखा, बघा सोप्या ट्रिक्स

Highlightsअसं वागणाऱ्या लाेकांपासून थोडं सावधच असायला हवं.

आपण रोज कित्येक लोकांना भेटत असतो. आपल्या कॉलनीमधल्या लोकांचा, आपल्या मित्रमैत्रिणींचा, अगदी सख्ख्या शेजाऱ्यांचा, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचा असे कित्येक वेगवेगळे ग्रुप असतात आणि आपण त्यात ॲक्टीव्ह असतो. या सगळ्या लोकांमध्ये नेहमीच वावरत असताना काही गोष्टी आवडतात तर काही खटकतात. त्यापैकी काही लोकांना खरंच आपलं कौतूक असतं, प्रेम असतं. तर काही लोकं मात्र प्रेमाचा, कौतुकाचा नुसताच आव आणत असतात. मनातल्या मनात तर ते आपल्यावर जळत असतात किंवा त्यांना आपला प्रचंड राग येत असतो... अशी लोकं ओळखणं थोडं ट्रिकी असतं. कारण कितीही झालं तरी त्यांना त्यांच्या भावना फार वेळ दाबून ठेवणं शक्य नसतं. म्हणूनच समोरच्या व्यक्तीचं थोडं निरिक्षण करा आणि ती तुमच्याबद्दल खरंच काय विचार करते ते जाणून घ्या....

कोण आपल्यावर जळतं, कोणाला आपला राग येतो, हे कसं ओळखायचं?

 

१. ज्या लोकांना तुमचा राग येत असतो किंवा जे तुमच्या प्रगतीवर जळत असतात असे लोक नेहमीच तुम्हाला सगळ्यांसमोर सल्ला देतात आणि तुम्ही जे काही करत आहात त्याला कमी लेखतात.

ना व्यायाम -ना डाएट, तरी वजन झरझर कमी होऊन ३० दिवसांत दिसाल फिट, पाहा कसे?

२. तुम्हाला यश मिळाल्यानंतर कधीच मोकळं हसून सगळ्यांसमोर तुमचं कौतूक करत नाहीत. कधी कधी तर तुम्हाला यश मिळाल्यानंतर ते तुमच्या समोर येणंही टाळतात.

३. तुमच्यावर जोक झाल्यानंतर जी व्यक्ती सर्वाधिक आनंदाने हसते, त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी नक्कीच आकस असू शकतो.

 

४. तुमच्या विषयी मनात राग असणारे लोक तुमच्या कामावर नकारात्मक कमेंट करतात. कोणी तुमच्या कामाविषयी बोलायचाच उशीर असतो की लगेच हे लोक त्यात सहभागी होतात आणि तुमचं कसं, कुठे, कधी चुकलं याविषयी सविस्तर माहिती देतात.

कोरियन मुलाने सांगितला तळपायांच्या भेगा रातोरात गायब करण्याचा भन्नाट उपाय- बघा तुफान व्हायरल व्हिडिओ

५. तुम्हाला यश मिळाल्यानंतर वरवर अभिनंदन करतात, पण तुमच्यापेक्षाही जास्त यश कोणी मिळवलंय, कोण तुमच्यापेक्षा जास्त पुढं गेलंय हे तुम्हाला तिथेच ऐकवतात आणि तुमचा आनंद कमी करतात. 

असं वागणाऱ्या लाेकांपासून थोडं सावधच असायला हवं. कारण त्यांना तुमच्या यशात नाही तर अपयशात आणि बदनामीतच जास्त आनंद असतो आणि ते त्या क्षणाची वाटच बघत असतात. 

 

Web Title: Identify who is angry with you, who is jealous of you in 1 minute, see simple tricks