Lokmat Sakhi >Social Viral > राेहित शर्माच्या लेकीला आवडणाऱ्या Labubu बाहुल्या आहेत कशा? राेहितही म्हणाला, यातलं काही कळत नाही कारण..

राेहित शर्माच्या लेकीला आवडणाऱ्या Labubu बाहुल्या आहेत कशा? राेहितही म्हणाला, यातलं काही कळत नाही कारण..

Labubu Dolls: Labubu टॉय सध्या जगभरात गाजत असून कित्येक सेलिब्रिटींकडे ते दिसतं. आता तर क्रिकेटर रोहित शर्मानेही (Rohit Sharma) याविषयीचीच एक पोस्ट शेअर केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 18:35 IST2025-06-13T17:24:25+5:302025-06-13T18:35:04+5:30

Labubu Dolls: Labubu टॉय सध्या जगभरात गाजत असून कित्येक सेलिब्रिटींकडे ते दिसतं. आता तर क्रिकेटर रोहित शर्मानेही (Rohit Sharma) याविषयीचीच एक पोस्ट शेअर केली आहे.

'I Still Don’t Get It': Rohit Sharma Reflects On Confusion Over Viral Labubu Dolls | राेहित शर्माच्या लेकीला आवडणाऱ्या Labubu बाहुल्या आहेत कशा? राेहितही म्हणाला, यातलं काही कळत नाही कारण..

राेहित शर्माच्या लेकीला आवडणाऱ्या Labubu बाहुल्या आहेत कशा? राेहितही म्हणाला, यातलं काही कळत नाही कारण..

Highlightsआज ते एवढं गाजत आहे की लहान मुलांप्रमाणेच महाविद्यालयांमधल्या तरुण मंडळींमध्येही त्याची क्रेझ आहे.

पुर्वी साध्या कापडी बाहुल्या असायच्या. पण जेव्हा अगदी चकाचक दिसणारी, सजलेली, नटलेली स्टायलिश बार्बी आली तेव्हा कापडाच्या, लाकडी बाहुल्या मागे पडल्या आणि गोडगोजिरी, नाजूक दिसणारी बार्बीच पाहिजे असा हट्ट मुली करू लागल्या. काही वर्षांपुर्वी बार्बीची प्रचंड क्रेझ आली होती. जिच्याकडे बार्बी असायची तिचा थाट काही वेगळाच असायचा.. तिला तिच्या मैत्रिणी आपोआपच भाव देऊ लागायच्या.. आता अशाच एका खेळण्याने लहान मुलांना वेड लावलं असून ते जगभरात चांगलंच गाजत आहे. ते खेळणं म्हणजे Labubu टॉय. या खेळण्याने एवढी प्रसिद्धी मिळवली की आता हे टॉय एक लक्झरी टॉय म्हणून ओळखलं जात आहे. रोहित शर्माच्या लेकीलाही ते खूप आवडत असून तिने तसे बरेच खेळणे जमा केल्याचं त्याच्या एका पोस्टमध्ये दिसून येतं.('I Still Don’t Get It': Rohit Sharma Reflects On Confusion Over Viral Labubu Dolls)


 

Labubu टॉय नेमकं आहे काय?

मुळात Labubu हे दि मॉन्स्टर या पुस्तकातलं एक काल्पनिक पात्र होतं. ते कसं दिसत असेल याविषयीचं डिझाईन हाँगकाँग येथील आर्टिस्ट कासिंग लुंगा यांनी केलं होतं. यानंतर या पात्राला Pop Mart International या चिनी कंपनीने तयार केलं आणि त्याची विक्री होऊ लागली.

लालबुंद मिरच्यांचा झणझणीत वऱ्हाडी ठेचा, जेवणात रंगत येऊन तोंडाला येईल खमंग चव..

हळूहळू ते खूपच प्रसिद्ध झालं. आज ते एवढं गाजत आहे की लहान मुलांप्रमाणेच महाविद्यालयांमधल्या तरुण मंडळींमध्येही त्याची क्रेझ आहे. कित्येक सेलिब्रिटींकडेही ते खेळणं हल्ली दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वीच चीनमध्ये एक कार्यक्रम झाला होता.

 

त्या कार्यक्रमात Labubu चा एक मोठा पुतळा तयार करण्यात आला होता. त्या पुतळ्यासाठी तब्बल १. २ कोटींची बोली लावण्यात आली. त्यातून मिळालेला पैसा अंध व्यक्तींसाठी वापरण्यात आला. यावरूनच हे पात्र सध्या किती लोकप्रिय आहे हे दिसून येतं.

वाळून गेलेल्या रोपालाही ८ दिवसांतच फुटतील नवी पानं! द्या रोपांना हिरवंगार करणारं 'हे' खास टॉनिक

“My girls tried explaining these to me, I still don’t get it,” अशी कॅप्शन टाकत रोहित शर्माने त्याच्या लेकीकडे असणाऱ्या Labubu टॉयचे फोटो इंस्टाग्रामवर काही दिवसांपुर्वीच शेअर केले होते. 

 

Web Title: 'I Still Don’t Get It': Rohit Sharma Reflects On Confusion Over Viral Labubu Dolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.