सकाळच्या घाई - गडबडीत किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर भांडी घासणे हे एक मोठे कंटाळवाणे व किचकट काम असते. यातही, कितीही काळजी घेतली तरी भांडी घासताना कपड्यांवर (how to wash utensils without getting wet) पाण्याचे शिंतोडे उडणे किंवा भांडी घासताना अंगावर पाणी उडणे ही अगदी कॉमन समस्या आहे. अनेकदा भांडी घासताना, सिंकमधील पाणी उडून आपले कपडे पूर्ण भिजतात. ओले झालेले कपडे दिवसभर तसेच राहिल्यास कंटाळवाणे तर वाटतेच, पण आरोग्यासाठीही ते चांगले नाही( tips to avoid clothes getting wet while washing dishes).
भांडी घासताना हाताबरोबरच कपडेही पूर्ण भिजतात आणि त्यामुळे त्रास होतो. विशेषतः घाईच्या वेळेला ही समस्या अधिक त्रासदायक ठरते. कितीही काळजीपूर्वक भांडी घासली तरी हा त्रास होतोच. यासाठीच, काही सोप्या ट्रिक्स वापरुन आपण भांडी घासतांना, भिजण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. भांडी घासताना कपडे भिजू नयेत (how to keep hands and clothes dry while cleaning utensils) यासाठीच्या खास ६ टिप्स पाहूयात. भांडी घासताना कपडे अजिबात न भिजवण्याच्या खास ६ सोप्या ट्रिक्स! या ट्रिक्स वापरून तुमचे काम आता अधिक सोपे आणि झटपट होईल.
भांडी घासताना कपडे ओले होऊ नयेत म्हणून....
१. भांडी घासताना कपडे ओले होऊ नये म्हणून नळाच्या पाण्याचा प्रवाह मंद ठेवणे महत्त्वाचे आहे. सामान्यतः आपण लवकर काम संपवण्यासाठी नळ पूर्णपणे जोरात उघडतो. जर तुम्ही सुद्धा असेच करत असाल, तर यापुढे असे करणे टाळा. कारण यामुळे तुमचे कपडे भिजण्याची शक्यता असते.
२. सामान्यतः आपण भांडी घासताना ती सिंकमध्ये एकावर एक रचून ठेवतो. यामुळे पाणी भांड्यांवर आपटून वर उडते आणि यामुळे कपडे जास्त ओले होतात. यासाठी, भांडी एका बाजूला व्यवस्थित रचून ठेवा आणि ती घासून झाल्यावर दुसऱ्या बाजूला सुकण्यासाठी ठेवा. आता जर सिंक छोटे असेल आणि भांडी जास्त असतील, तर आधी छोटी भांडी धुवा. त्यानंतर मोठी भांडी एकेक करून धुवा.
गॅस शेगडी दिसेल नव्यासारखी लख्ख! ४ टिप्स - न घासताच चिकट - तेलकट डाग निघतील सहज...
साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...
३. आपण ऑनलाइन वॉटरप्रूफ ॲप्रन देखील वापरु शकता. हा ॲप्रन तुमच्या कपड्यांना पाणी आणि शिंतोड्यांमुळे ओले होण्यापासून वाचवण्याचे काम करेल. हे घातल्यानंतर तुमचे कपडे कोरडे राहू शकतात. तसेच, तुम्ही वारंवार कपडे ओले होण्याच्या समस्येतून मुक्त होऊ शकता.
४. पाण्याचे शिंतोडे थांबवण्यासाठी, सिंकच्या कडेला सिमेंटची बॉर्डर बनवा. सर्वातआधी एका वाटीत सिमेंट घ्या. आता त्यात बारीक वाळू किंवा बारीक रेती मिसळा. मिश्रण पाणी घालून चांगले एकत्र करा. हे मिश्रण तयार झाल्यावर, त्याची मदत घेऊन सिंकच्या कडेला बॉर्डरसारखी रचना करा. यामुळे पाणी अडवले जाऊन ते थेट अंगावर उडणार नाही, यामुळे भांडी घासताना आपण भिजणार नाही.
५. भांडी घासताना सिंकच्या कडांवरून पाणी बाहेर सांडते आणि कपड्यांना लागते. हे टाळण्यासाठी, सिंकच्या कडेला (जे तुमच्या पोटाच्या बाजूला आहे) ओल्या कपड्याचा किंवा जाड स्पंजचा रोल ठेवा.
६. जर ॲप्रन नसेल, तर पोटाच्या आणि छातीच्या भागावर एक जाड कॉटनचा टॉवेल किंवा नॅपकिन गुंडाळा. यामुळे पाणी शोषले जाईल आणि तुमचे कपडे ओले होणार नाहीत.