Shoe Care During Monsoon: पावसामुळे सगळीकडे चिखल असतो, पाणी साचलेलं असतं. अशात पायी बाहेर पडल्यावर शूज चिखलात भरणं किंवा भिजणं कॉमन आहे. पण खरी अडचण तेव्हा होते जेव्हा हे चिखलानं भरलेले आणि घाण झालेलले शूज धुणं शक्य नसतं. शूज वाळत नसल्यानं त्यातून दुर्गंधीही येऊ लागते. नेहमीच भिजत असल्यानं शूजमध्ये बॅक्टेरिया आणि फंगस होतात. ज्यामुळे दुर्गंधी आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशात काही सोपे आणि प्रभावी उपाय करणं गरजेचं ठरतं.
उन्ह नसेल तर फॅन आहेच
पावसाच्या दिवसांमध्ये शूज वाळवणं सगळ्यात अवघड काम असतं. कारण या दिवसांमध्ये उन्ह फार कमी पडतं. अशात शूज फॅनखाली सुकायला ठेवू शकता किंवा डेअर ड्रायरच्या मदतीनं सुकवा. शूजच्या आत पेपर कोंबून ठेवा, ज्यामुळे ओलावा लवकर कमी होतो.
पुन्हा पुन्हा धुवू नका
पावसाळ्यात रोज रोज पाण्यानं आणि साबणानं धुणं टाळलं पाहिजे. असं केल्यास शूजचं मटेरिअल खराब होतं. शूज साफ करण्यासाठी मुलायम ब्रश किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. माती सुकू द्या नंतर ब्रशनं ती साफ करू शकता.
बेकिंग सोड्यानं जाईल दुर्गंधी
जर शूज वाळल्यानंतरही त्यातून दुर्गंधी येत असेल तर त्यात रात्रभर थोडा बेकिंग सोडा टाकून ठेवला. असं केल्यानं ओलावा कमी होईल आणि दुर्गंधीही दूर होईल. त्याशिवाय दुर्गंधी घालवण्यासाठी ड्राय टी बॅग्सही त्यात ठेवू शकता.
सॉक्स वापरा
पावसाच्या दिवसांमध्ये सॉक्सशिवाय शूज घालाला तर घामामुळे आणि ओलाव्यामुळे त्यातून दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे रोज कॉटनचे सॉक्स घाला. सॉक्सनं पायांचा फंगल इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
एक्स्ट्रा शूज ठेवा
रोज एकच शूज घातल्यानं ते लवकर वाळत नाही आणि ना त्यातून दुर्गंधी जाते. त्यामुळे प्रयत्न करा की, शूजचे दोन जोड ठेवा. जे आलटून पालटून वापरू शकाल.