lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > पाहा हा पेपर जुगाड, म्हणे फ्रिजमध्ये पेपर ‘असा’ अडकवला तर वीजबिल येतं कमी..

पाहा हा पेपर जुगाड, म्हणे फ्रिजमध्ये पेपर ‘असा’ अडकवला तर वीजबिल येतं कमी..

How to use refrigerator to save electricity : उन्हाळ्यात विजेचा वापर वाढतो, वीजबिल किमी करण्यासाठी पाहा लोक काय काय जुगाड करतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2024 04:32 PM2024-04-04T16:32:37+5:302024-04-04T17:22:47+5:30

How to use refrigerator to save electricity : उन्हाळ्यात विजेचा वापर वाढतो, वीजबिल किमी करण्यासाठी पाहा लोक काय काय जुगाड करतात..

How to use refrigerator to save electricity | पाहा हा पेपर जुगाड, म्हणे फ्रिजमध्ये पेपर ‘असा’ अडकवला तर वीजबिल येतं कमी..

पाहा हा पेपर जुगाड, म्हणे फ्रिजमध्ये पेपर ‘असा’ अडकवला तर वीजबिल येतं कमी..

उन्हाळा सुरु होताच, आपल्या शरीराला गारवा हवाहवासा वाटतो. आपण अधिक वेळ पंख्याखाली, एसीजवळ किंवा फ्रिजमधलं थंड पाणी पिऊन दिवस काढतो (Save Electricity). फ्रिजमधलं पाणी पिण्यासाठी आपण बॉटलमध्ये पाणी साठवून ठेवतो. बॉटलमधलं पाणी संपलं की, आपण पुन्हा बॉटलमध्ये पाणी भरून फ्रिजमध्ये ठेवतो (Refrigerator Use). फ्रिजमधली बाटली बाहेर काढण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती फ्रिजचा दरवाजा उघडते.

फ्रिजचा वारंवार दार उघडल्याने, फ्रिजच्या आतील तापमानावर फरक पडतो. शिवाय वीजबिलही जास्त येते. पण फ्रिज उघडणं तर आपण थांबवू शकत नाही. वीजबिल कमी येण्यासाठी युट्युबर गृहिणीने सोशल मिडीयावर एक सोपा फंडा शेअर केला आहे. ज्यात तिने असा दावा केला की, फ्रिजमध्ये साधा पेपर अडकवल्याने वीजबिल कमी येते की जास्त? हे आपण ओळखू शकता. पण टिश्यू पेपरमुळे ही गोष्ट कशी ओळखता येईल? पाहूयात(How to use refrigerator to save electricity).

पेपरच्या जुगाडामुळे वीजबिल कमी येते?

आपण पाहिलं असेल, फ्रिजचा दरवाजा उघडायला गेल्यावर तो पटकन उघडतो, किंवा बंद केल्यावर किंचितसा उघडा राहतो. दरवाजा नीट लागत नाही, ज्यामुळे त्यातील थंड हवा बाहेर पडते. अशा स्थितीत फ्रिजला गॅस तयार करण्यात अडचण निर्माण होते. शिवाय विजेचाही जास्त वापर होतो. मुख्य म्हणजे त्याच्या कम्प्रेसरवर परिणाम होतो. फ्रिजचा दरवाजा न लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मुख्यतः रबर सैल किंवा चिकट झाले असेल तर, दरवाजा व्यवस्थित लागत नाही.

एका दिवसात जास्तीत जास्त किती साखर खावी? शरीराला किती साखरेची गरज असते?

फ्रिजचा दरवाजा नीट बसवण्यासाठी आपल्याला एक कागदाची गरज आहे. एक साधा पेपर किंवा टिश्यू पेपर घ्या. फ्रिजबाहेर राहील, अशा पद्धतीने दरवाजा बंद करा. यांनंतर फ्रिजच्या दरवाजात अडकवलेला पेपर हलक्या हाताने खेचा. जर तो पेपर सहज पटकन निघाला तर, फ्रिजचा रबर खराब किंवा काहीतरी समस्या आहे, हे समजून जा आणि साफ करा.

फ्रिजचा रबर स्वच्छ करण्यासाठी टिप्स

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड भरपूर खाल्ले तर वजन कमी होतो? पण कुणाचे-कुणी न खाणंच बरं..

- फ्रिजचा रबर अधिक घाण किंवा चिकट झाले असेल तर, कोमट पाण्याने स्वच्छ करा.

- आपण घरगुती क्लीनर किंवा डिश लिक्विडच्या वापराने देखील फ्रिजचा रबर स्वच्छ करू शकता.

- बऱ्याचदा अस्वच्छ असल्या कारणाने रबर सैल होते, त्यामुळे महिन्याला फ्रिज स्वच्छ करा.

Web Title: How to use refrigerator to save electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.