How to clean dirty woolen clothes: थंडीला सुरूवात झाली की, उलनचे कपडे वापरणं कॉमन आहे. थंडीपासून बचावासाठी हे गरम कपडे फायदेशीर असतात. या कपड्यांची वेळोवेळी स्वच्छता करणं खूप महत्वाचं ठरतं. जर योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यांचं शेल्फ लाइफ कमी होऊ शकतं. उलनचे कपडे धुण्यासाठी योग्य पद्धत वापरणं महत्वाचं ठरतं. तसेच ते योग्यपणे स्टोर करणं देखील महत्वाचं आहे. अशात आज आम्ही आपल्याला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, जी वापरून जुने दिसणारे उलनचे कपडे अगदी नव्यासारखे चकाचक दिसतील.
ईनोचा वापर
उलनच्या कपड्यांमधील मळ-धूळ साफ करण्यासाठी आणि कपडे चकाचक करण्यासाठी कोमट पाणी, थोडं शाम्पू आणि अर्धा चमचा ईनोची गरज लागेल. या तिन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करा. या मिश्रणात कपडे भिजवून ठेवा. चांगला परिणाम मिळवण्यासाठी कपडे साधारण १० ते १५ मिनिटे या पाण्यात भिजत ठेवा.
१० ते १५ मिनिटांनंतर पाण्याचा रंग मळकट झालेला दिसेल. म्हणजेच कपड्यांमधील मळ निघाला आहे. त्यानंतर कपडे या पाण्यातून काढून साध्या पाण्याने धुवा. ही ट्रिक वापरून कपडे जास्त न घासताही साप होतील. पण डार्क रंगाच्या कपड्यांसाठी ईनोचा वापर करू नये. स्वेटर आणि जॅकेट ड्रायक्लीनिंगला देण्याऐवजी आपण ही घरगुती ट्रिक वापरू शकता.
काय काळजी घ्याल?
उलनचे कपडे जास्त पिळू नये. जास्त पिळल्याने त्यांची फिटींग बिघडते आणि त्यांचं शेल्फ लाइफही कमी होतं. उलनचे कपडे चांगले सुकवणं देखील महत्वाचं ठरतं. जर ते योग्यपणे वाळले नाही तर ओलाव्यामुळे त्यांचा वासही येऊ शकतो. त्यामुळे उलनचे कपडे उन्हात चांगले वाळत घाला.
