Lokmat Sakhi >Social Viral > तुम्हीही धान्य साठविण्यासाठी केमिकलयुक्त पावडर वापरता? मग हे तातडीने वाचा- तज्ज्ञ सांगतात धोके..

तुम्हीही धान्य साठविण्यासाठी केमिकलयुक्त पावडर वापरता? मग हे तातडीने वाचा- तज्ज्ञ सांगतात धोके..

How To Store Rice, Dal And Grains For Long: धान्य साठविण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलयुक्त पावडर वापण्याची सवय तुम्हालाही असेल तर हे एकदा वाचायलाच हवे..(simple tricks and tips for the proper storage of grains)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2025 16:36 IST2025-07-14T16:35:42+5:302025-07-14T16:36:43+5:30

How To Store Rice, Dal And Grains For Long: धान्य साठविण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलयुक्त पावडर वापण्याची सवय तुम्हालाही असेल तर हे एकदा वाचायलाच हवे..(simple tricks and tips for the proper storage of grains)

how to store rice, dal and grains for long, simple tricks and tips for the proper storage of grains | तुम्हीही धान्य साठविण्यासाठी केमिकलयुक्त पावडर वापरता? मग हे तातडीने वाचा- तज्ज्ञ सांगतात धोके..

तुम्हीही धान्य साठविण्यासाठी केमिकलयुक्त पावडर वापरता? मग हे तातडीने वाचा- तज्ज्ञ सांगतात धोके..

Highlightsधान्य साठविण्यासाठी हल्ली एअर टाईट प्लास्टिकच्या बॅग मिळतात.

वर्षभराचं धान्य एकदाच भरून ठेवण्याचं काम कित्येक घरांमध्ये केलं जातं. आता मुंबईसारख्या काही ठिकाणी दमट हवेमुळे वर्षभर धान्य भरून ठेवणं थोडं अवघड जातं. कारण वातावरणामुळे ते लवकर खराब होतं. असे काही अपवाद सोडले तर इतर ठिकाणी मात्र गहू, डाळी, तांदूळ, मसाले, तिखट एकदम आणलं जातं. धान्य साठवून ठेवण्याच्या काही पारंपरिक पद्धतीही आहेत. पण त्या थोड्या वेळखाऊ असल्यामुळे आता बऱ्याच घरांमध्ये धान्याला सरळ केमिकलयुक्त पावडर लावली जाते आणि धान्य भरून ठेवलं जातं (simple tricks and tips for the proper storage of grains). पण हे आराेग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.(how to store rice, dal and grains for long?)

 

धान्य साठविण्यासाठी तुम्हीही केमिकलयुक्त पावडर वापरता का?

तांदूळ आणि डाळी या पदार्थांना अनेक घरांमध्ये पावडर लावली जाते. कारण वापरण्यापुर्वी हे पदार्थ धुवून घेतले जातात. यामुळे धान्य जास्त दिवस टिकतं, त्यात अळ्या किडे होत नाहीत. पण ते धुताना जर तुमच्याकडून काही चुकत असेल तर त्याचा मात्र आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.

संकष्टी चतुर्थी: साबुदाणा भिजत घालायचंच विसरलं? फक्त अर्ध्या तासांत साबुदाणा भिजवण्याचे २ उपाय 

तांदूळ किंवा डाळी वापरण्यापुर्वी २ ते ३ पाण्याने धुवायला हव्या. धुताना हाताने थोड्या चोळायला हव्या. पण अनेक घरांमध्ये सकाळी गडबडीच्या वेळी खूप घाईघाईने डाळ- तांदूळ धुतले जातात. फक्त हलक्या हाताने खळबळून त्यांचं पाणी बदललं जातं. यामुळे पावडरचा काही अंश तुमच्या पोटातही जाऊ शकतो. रोज याच पद्धतीने तुमच्या घरात डाळ- तांदळाची स्वच्छता होते असेल तर ते आरोग्यासाठी बघा किती घातक ठरू शकतं..


 

डाळ- तांदूळ आणि इतर धान्य साठविण्याचे पारंपरिक उपाय

१. धान्य साठवून ठेवण्याचा पारंपरिक उपाय म्हणजे त्याला चांगलं ऊन देऊन कडक उन्हात ते वाळवून घ्यावे.

२. यानंतर एखाद्या हवाबंद डब्यात किंवा ड्रममध्ये तळाशी कडुलिंबाचा पाला घालावा, त्यावर थोडं धान्य घालून त्यावर पुन्हा कडुलिंबाचा पाला घालावा.

इनडोअर प्लांट्स चांगले वाढत नाहीत? कुंडीतल्या मातीत किचनमधले ५ पदार्थ मिसळा- रोपं वाढतील भराभर

त्यावर थोडं खडेमीठ ठेवावं. त्यावर पेपर झाकून टाकावा आणि पुन्हा याच पद्धतीने एकानंतर एक धान्य, कडुलिंबाचा पाला आणि मीठ असा थर द्यावा. या पद्धतीने साठवलेलं धान्य लवकर खराब होत नाही.

३. धान्य साठविण्यासाठी हल्ली एअर टाईट प्लास्टिकच्या बॅग मिळतात. त्यांचा वापर करण्यासही हरकत नाही. 

 

Web Title: how to store rice, dal and grains for long, simple tricks and tips for the proper storage of grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.