वारंवार बाजारात जाणं होत नाही त्यामुळे कित्येक घरांमध्ये कांदे, बटाटे, लसूण जास्त प्रमाणात घेऊन ठेवला जातो. कारण हे पदार्थ जास्त प्रमाणात लागतात आणि शिवाय जेव्हा घरात कोणतीही भाजी नसेल तेव्हा चटकन कांद्याबटाट्याची भाजी करणं सोपं जातं. पण बऱ्याचदा असं होतं की एकदाच घेऊन ठेवलेल्या बटाट्यांपैकी अर्ध्या बटाट्यांना तर कोंब फुटतात आणि ते खराब होऊन जातात. कोंब आलेले बटाटे खाण्यासाठी योग्य नसतात (how to store potato for long?). त्यामुळे एकदा बटाट्यांना कोंब फुटले की बटाटे वाया जाऊन पैसेही वाया जातात (simple tips and tricks for the storage of potato). असं होऊ नये आणि बटाटे जास्तीतजास्त दिवस टिकून राहावेत, यासाठी काय करता येऊ शकतं ते पाहूया..(Home Hacks For The Storage Of Potato)
बटाटे साठवून ठेवण्याची योग्य पद्धत
बटाटे महिनोंमहिने साठवून ठेवण्याची ही जी पद्धत आपण पाहणार आहोत, त्या पद्धतीने बरेच शेतकरी बटाटे साठवून ठेवतात. शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात बटाटे साठवून ठेवत असले तरी आपण घरगुती स्तरावरही ही पद्धत वापरू शकतो.
मे महिन्यात कुंडीत लावा ‘ही’ रोपं, वर्षभर रंगबिरंगी फुलांनी बहरुन जाईल तुमची गॅलरी!
त्यासाठी आपल्याला लाकूड आणि रेती लागणार आहे.
सगळ्यात आधी तर बटाटे साठवून ठेवण्यासाठी अशी जागा निवडा जी पुर्णपणे कोरडी पण थंड असेल. यानंतर त्या जागेवर लाकडाच्या फळ्या पसरवून ठेवा.
लाकडाच्या फळ्या पसरवून ठेवल्यानंतर त्यावर रेती टाका. लाकूड आणि रेती दोन्हीही अगदी कोरडे असेल, त्यांच्यामध्ये कुठेही ओलसरपणा नसेल याची मात्र काळजी घ्या.
डॉक्टर सांगतात बेदाणे खाण्याच्या २ योग्य पद्धती! हिमाेग्लोबिन वाढेल, कित्येक आजार होतील छुमंतर..
रेतीवर बटाटे ठेेवा आणि त्यावर पुन्हा रेती घाला. रेतीमध्ये बटाटे चांगले दडवून ठेवले तर ते कित्येक दिवस खराब होत नाहीत, असं काही शेतकरी सांगतात. या पद्धतीने बटाटे साठवून ठेवल्यानंतर त्यांच्यावर पाणी पडून ते ओेलसर होणार नाहीत, याची मात्र काळजी घ्या.