Join us

पावसाळ्यात लाइटभोवती घोंघावणाऱ्या कीटक आणि किड्यांनी वैताग आणला? पाहा ५ सोपे उपाय-बंदोबस्त जोरदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 19:30 IST

Rainy season insects: घरातील लाइट सुरू असतील पूर्ण घरात त्यांच्या पंखांचा सडा पडलेला असतो. अशात ही कीटक पळवून लावण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत.

Rainy season insects: पावसाच्या दिवसांमध्ये वेगवेगळे कीटक घरांमध्ये घुसतात. ज्यामुळे वैताग येतो. कारण हे कीटक कपड्यांमध्ये घुसतात आणि खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्येही पडतात. तसेच या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त त्रास होतो घरातील किंवा बाहेरील लाइटभोवती गिरक्या घारणारे वेगळे उडणारे कीटक. घोळक्यानं हे कीटक येतात आणि लाइटवर बसतात. घरातील लाइट सुरू असतील पूर्ण घरात त्यांच्या पंखांचा सडा पडलेला असतो. अशात ही कीटक पळवून लावण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत.

लाइटवरील कीटक कसे पळवाल?

कडूलिंब आणि गोवरीचा धूर

कडूलिंबाची पानं आणि शेणाच्या गोवरीचा धूर केल्यास या धुरामुळे हे कीटक लगेच पळून जातील. कारण या दोन्ही गोष्टींमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्या ठिकाणी हे कीटक जमा होत आहेत तिथे कडूलिंब आणि गोवरीचा धूर करा. यानं कीटकांचं फत्ते होऊन जाईल.

कापूर जाळा

कापराच्या गंधानं हे कीटक बेशुद्ध पडतात. यासाठी चंदनाची किंवा आंबाच्या एका छोट्या लाकडाची आग तयार करा. त्यावर थोडा कापूर टाका. कापूर टाकल्यावर आग विझवा. यातून धूर येऊ द्या. या धुरानं कीटक पळून जातील.

घरीच तयार करा एअरफ्रेशनर

लाइटवर गोळा होणारे कीटक पळवून लावण्यासाठी तुम्ही घरीच एक एअर फ्रेशनर तयार करा. हे तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये थोडा बेकिंग सोडा घ्या आणि त्या यूकेलिप्टस, सिट्रोनेला एसेंशिअल ऑइल आणि लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. वेळोवेळी हे घरात वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रे करा. खासकरून लाइटच्या आजूबाजूला स्प्रे करा.

लाइट बंद करा

जर तुम्हाला घरातील किंवा बाल्कनीतील लाइटभोवती उडणारे कीटक दिसत असतील तर थोड्या वेळासाठी घरातील लाइट बंद ठेवा. या वेळात हे कीटक बाहेरच्या प्रकाशाकडे आकर्षित होतील आणि घरातून निघून जातील. हवं तर तुम्ही यांना पळवण्यासाठी घरात झेंडूच्या फुलांची कुंडी किंवा तुळशीचं झाडही ठेवू शकता.

सायंकाळी खिडकी-दरवाजे बंद ठेवा

सायंकाळी लाइट लावण्याआधी घरातील खिडक्या-दारं बंद करा. त्यानंतर घरातील लाइट चालू करा. कारण हे कीटक प्रकाशाच्या आजूबाजूलाच भिरभिरतात. त्यामुळे लाइट लावण्याआधी खिडक्या-दरवाजे बंद ठेवा. 

टॅग्स :सोशल व्हायरलमोसमी पाऊसस्वच्छता टिप्स