Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > बाथरुमच्या पिवळ्या टाइल्स १० मिनिटांत चकाचक स्वच्छ करणारे किचनमधले २ पदार्थ, ५० रुपयांत काम फत्ते

बाथरुमच्या पिवळ्या टाइल्स १० मिनिटांत चकाचक स्वच्छ करणारे किचनमधले २ पदार्थ, ५० रुपयांत काम फत्ते

Cleaning Tips For Bathroom: बाथरुममधल्या टाईल्सचा पिवळटपणा काही केल्या कमी होत नसेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा...(how to remove yellow stains from bathroom tiles?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2026 19:00 IST2026-01-20T16:55:37+5:302026-01-20T19:00:47+5:30

Cleaning Tips For Bathroom: बाथरुममधल्या टाईल्सचा पिवळटपणा काही केल्या कमी होत नसेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा...(how to remove yellow stains from bathroom tiles?)

how to remove yellow stains from bathroom tiles, home hacks to get rid of yellow stains from bathroom tiles | बाथरुमच्या पिवळ्या टाइल्स १० मिनिटांत चकाचक स्वच्छ करणारे किचनमधले २ पदार्थ, ५० रुपयांत काम फत्ते

बाथरुमच्या पिवळ्या टाइल्स १० मिनिटांत चकाचक स्वच्छ करणारे किचनमधले २ पदार्थ, ५० रुपयांत काम फत्ते

Highlightsटाईल्सचा पिवळेपणा कमीतकमी वेळेत आणि कमीतकमी मेहनतीत निघून जाईल...

टॉयलेट, बाथरुम या आपल्या घरातल्या जागा लवकर खराब होतात. त्या ठिकाणी बराच वेळ ओलसरपणा असतो. त्यामुळे तिथल्या भिंती आणि जमिनीवरच्या टाईल्सही लवकर खराब होतात. आपण ते नियमितपणे घासत असलो तरीही तेवढं करणं त्यासाठी पुरेसं ठरत नाही. कारण सतत घासूनही भिंतीच्या, जमिनीवरच्या टाईल्स पिवळ्या पडायला लागलेल्या दिसतात. त्यांना एकदा पक्का पिवळा रंग चढला की मग त्या स्वच्छ करणं कठीण होऊन जातं. त्या टाईल्स घासून घासून हात गळून जातात, पण तरीही त्या काही म्हणाव्या तशा स्वच्छ दिसत नाहीत. तुमच्या घरातल्या टॉयलेट, बाथरुमची अशीच अवस्था झाली असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा (home hacks to get rid of yellow stains from bathroom tiles). टाईल्सचा पिवळेपणा कमीतकमी वेळेत आणि कमीतकमी मेहनतीत निघून जाईल...(how to remove yellow stains from bathroom tiles?)

बाथरुममधल्या टाईल्सचा पिवळटपणा कमी करण्यासाठी उपाय

 

१. व्हिनेगर 

आपल्या स्वयंपाक घरात वेगवेगळ्या पदार्थांसाठी व्हिनेगर असतंच. त्याचा वापर आता बाथरुमच्या टाईल्सचा पिवळेपणा कमी करण्यासाठी कसा करायचा ते पाहूया.

हिरव्यागार मिरच्यांचं झणझणीत लोणचं, तोंडाला चव आणणारा मस्त पदार्थ, घ्या झटपट होणारी सोपी रेसिपी 

हा उपाय करण्यासाठी १ कप पाण्यामध्ये ४ मोठे चमचे भरून व्हिनेगर घ्या. आता हे मिश्रण बाथरुमच्या पिवळ्या पडलेल्या टाईल्सवर शिंपडून द्या. त्यानंतर १० मिनिटांनी एखादा बाथरुम घासायचा ब्रश घ्या आणि घासून काढा. डाग अगदी पटकन  निघून गेल्यासारखे जाणवतील. 

 

२. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर या दोन्हींचं मिश्रण म्हणजे बाथरुमच्या टाईल्सचा पिवळेपणा कमी करण्यासाठीचा एक उत्कृष्ट उपाय आहे.

१ महिन्यात वजन उतरेल- फक्त ३ सोप्या गोष्टी नियमितपणे करा, नेहमीच सडपातळ, निरोगी राहाल

यासाठी अर्धा लीटर पाण्यामध्ये ४ ते ५ चमचे व्हिनेगर आणि तेवढाच बेकिंग सोडा घाला. आता हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. बाथरुमच्या पिवळ्या पडलेल्या टाईल्सवर टाका आणि १० ते १२ मिनिटांनी थोडं गरम पाणी घालून घासून घ्या. टाईल्स अगदी कमी मेहनतीत आणि कमी वेळात स्वच्छ, चकाचक होतील. 

 

Web Title : रसोई के इस सामान से बाथरूम की टाइल्स 10 मिनट में साफ करें।

Web Summary : बाथरूम की पीली टाइल्स को रसोई के सामान से चमकाएं। सिरका या बेकिंग सोडा और सिरके का मिश्रण दागों को आसानी से हटा देता है। इन घरेलू नुस्खों से आपकी बाथरूम की टाइल्स चमक उठेंगी।

Web Title : Clean bathroom tiles in 10 minutes with a kitchen ingredient.

Web Summary : Restore shine to yellowed bathroom tiles with simple kitchen solutions. Vinegar or baking soda and vinegar mix can remove stains quickly with minimal scrubbing. These home hacks will make your bathroom tiles sparkle effortlessly.