Lokmat Sakhi >Social Viral > ब्लाऊज-कुर्तीला काखेत पडलेले घामाचे डाग निघत नाहीत? वापरा स्वयंपाकघरातील २ पदार्थ-डाग गायब...

ब्लाऊज-कुर्तीला काखेत पडलेले घामाचे डाग निघत नाहीत? वापरा स्वयंपाकघरातील २ पदार्थ-डाग गायब...

How To Remove Sweat Stains From Clothes With Onion : Sweat stains remove hacks : Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse : कपड्यांवरील घामाचे हट्टी - पिवळसर डाग जात नाहीत मग हा घरगुती उपाय करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 17:36 IST2025-06-19T17:35:28+5:302025-06-19T17:36:07+5:30

How To Remove Sweat Stains From Clothes With Onion : Sweat stains remove hacks : Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse : कपड्यांवरील घामाचे हट्टी - पिवळसर डाग जात नाहीत मग हा घरगुती उपाय करा.

How To Remove Sweat Stains From Clothes With Onion Sweat stains remove hacks Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse | ब्लाऊज-कुर्तीला काखेत पडलेले घामाचे डाग निघत नाहीत? वापरा स्वयंपाकघरातील २ पदार्थ-डाग गायब...

ब्लाऊज-कुर्तीला काखेत पडलेले घामाचे डाग निघत नाहीत? वापरा स्वयंपाकघरातील २ पदार्थ-डाग गायब...

आपल्या रोजच्या वापरातील कपड्यांवर कमी अधिक प्रमाणात घामाचे डाग पडतात. शक्यतो आपल्या नेहमीच्या कपड्यांच्या काखेतील भागांवरच असे घामाचे डाग पडतात. कपड्यांवर घामाचे डाग एकदा पडले की ते कितीही वेळा साबण, डिटर्जंट लावून धुतले तरी देखील जाता जात नाहीत. त्यामुळे आवडते शर्ट, ब्लाऊज-कुर्ती, टॉप किंवा ड्रेसवर असे घामाचे डाग (How To Remove Sweat Stains From Clothes With Onion) राहिले की संपूर्ण लुक खराब होतो आणि ते कपडे वापरणं (Sweat stains remove hacks) टाळलं जातं. अनेकदा आपल्या कपड्यांवरील घामाचे डाग इतके ठसठशीत दिसतात की यामुळे नवे कपडे देखील अगदी जुनेपुराणे दिसू लागतात. कपड्यांवरील घामाच्या डागांमुळे कपड्यांचा चमकदारपणा कमी होतो आणि आवडते कपडे कपाटातच पडून राहतात(Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse).

आपल्या कपड्यांवरील असे हट्टी घालवण्यासाठी कितीही महागडे साबण, डिटर्जंट वापरले, तरी ते डाग जसेच्या तसे राहतात. यासाठीच, कपड्यांवरील घामाचे डाग घालवण्यासाठी आपण काही साधेसोपे घरगुती उपाय देखील करु शकतो. कपड्यांवरील घामाचे डाग घालवण्यासाठी स्वयंपाकघरातील कांदा अतिशय फायदेशीर ठरतो. साबण, डिटर्जंटमधील केमिकल्सच्या वापराशिवाय, नैसर्गिक पद्धतीने कपड्यांवरील घामाचे डाग घालवण्यासाठी कांद्याचा वापर कसा करायचा ते पाहा... 

कांद्याच्या मदतीने कपड्यांवरील घामाचे डाग कसे घालवावेत?

कपड्यांवरील घामाचे डाग घालवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील कांदा, मीठ या दोन वस्तू आणि जुना टूथब्रश इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. स्वयंपाकघरातील या दोन पदार्थांच्या मदतीने आपण कपड्यांवरील हट्टी घामाचे डाग अगदी सहजपणे काढू शकतो. आता यासाठी नेमकं करायचं काय ते पाहूयात. 

पावसाळ्यात लाईटभोवती भरमसाठ किडे घोंघावतात तेव्हा करा 'हा' घरगुती उपाय- दरवर्षीचा त्रास गायब...

किचन सिंकच्या पाईपमधून झुरळं घरभर येतात? वापरा 'हा' होममेड स्प्रे - खिशाला परवडणारा असरदार उपाय...

नेमका उपाय आहे काय ? 

कपड्यांवरील घामाचे डाग घालवण्यासाठी सर्वातआधी एक कांदा घेऊन तो गोलाकार पद्धतीने कापून त्याचे काप करून घ्यावेत. त्यानंतर या गोलाकार आकाराच्या कांद्याच्या चकत्यांवर मीठ भुरभुरवून घालावे. आता मीठ भुरभुरवून घेतलेली कांद्याची चकती थेट घामाच्या डागांवर घासून घ्यावी. किमान २ ते ५ मिनिटे ही कांद्याची चकती घामाच्या डागांवर घासून घेतल्यानंतर जुन्या टूथब्रशच्या मदतीने घामाचे डाग घासून घ्यावेत. मग कपडे तसेच तासभर राहू द्यावेत. तासाभरानंतर गरम पाण्यांत हे कपडे साबण किंवा डिटर्जंटच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय केल्यास कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवरील घामाचे डाग अगदी सहजपणे निघून जातील व कपडे नव्यासारखे दिसू लागतील.

Web Title: How To Remove Sweat Stains From Clothes With Onion Sweat stains remove hacks Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.