Lokmat Sakhi >Social Viral > स्टिकर्स काढताना नव्या भांड्यावर चिकट- पांढरे डाग राहतात? २ उपाय- काही सेकंदात डाग गायब 

स्टिकर्स काढताना नव्या भांड्यावर चिकट- पांढरे डाग राहतात? २ उपाय- काही सेकंदात डाग गायब 

2 Ways to Remove Sticker from Stainless Steel: नव्या भांड्यांवरची स्टिकर्स अनेकदा व्यवस्थित निघत नाहीत. त्यासाठीच हे काही सोपे उपाय पाहा..(how to remove stickers from new utensils?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 15:59 IST2025-05-06T15:58:31+5:302025-05-06T15:59:26+5:30

2 Ways to Remove Sticker from Stainless Steel: नव्या भांड्यांवरची स्टिकर्स अनेकदा व्यवस्थित निघत नाहीत. त्यासाठीच हे काही सोपे उपाय पाहा..(how to remove stickers from new utensils?)

how to remove stickers from new utensils, How to remove sticker glue from new utensils? 2 Ways to Remove Sticker from Stainless Steel | स्टिकर्स काढताना नव्या भांड्यावर चिकट- पांढरे डाग राहतात? २ उपाय- काही सेकंदात डाग गायब 

स्टिकर्स काढताना नव्या भांड्यावर चिकट- पांढरे डाग राहतात? २ उपाय- काही सेकंदात डाग गायब 

Highlightsहे काही उपाय पाहा, यामुळे तुम्हाला स्टिकर अगदी झटपट काढता येतील.

घर म्हटलं की नव्या गोष्टींची खरेदी होतच असते. घरातल्या कित्येक वस्तू जशा बदलल्या जातात आणि तिथे नव्या वस्तू येतात, तसंच काहीसं भांड्यांचंही असतंच.. बऱ्याच गृहिणींना स्वयंपाक घरातली भांडी, बरण्या, ताटल्या, वाट्या, चमचे अशा वस्तू घेण्याची आवड असते. जेव्हा या नव्या वस्तू आपल्या घरात येतात, तेव्हा त्यांच्यावर स्टिकर लावलेले असते. ते स्टिकर अनेक जणी नखाने, सुरीने, कात्रीने खरवडून काढण्याचा प्रयत्न करतात. पण ते स्टिकर काही पुर्णपणे निघून येत नाही. भांड्यांवर स्टिकरचे चिकट पांढरे डाग तसेच राहतात (How to remove sticker glue from new utensils?). ते काढताना मग बराच त्रास होतो. म्हणूनच आता हे काही उपाय पाहा (2 Ways to Remove Sticker from Stainless Steel). यामुळे तुम्हाला स्टिकर अगदी झटपट काढता येतील.(how to remove stickers from new utensils?)

 

नव्या भांड्यांवरची स्टिकर्स कशी काढून टाकावी?

१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे ज्या भांड्यावरचे स्टिकर काढायचे आहे ते भांडे १० ते १२ सेकंद गॅसवर ठेवून गरम करा. भांडे अशा पद्धतीने गरम करावे की जिथे स्टिकर लावलेले असेल त्याच्या खालच्या बाजुने भांडे गरम झाले पाहिजे.

४ दिवस टिकणारे मेथीचे थेपले- सहलीला घेऊन जाण्यासाठी पौष्टिक पदार्थ- नाश्त्यासाठीही परफेक्ट

यानंतर एखादी सुरी किंवा कात्री घ्या आणि तिच्या टोकाने अलगदपणे स्टिकर काढा. जर स्टिकर झटपट आणि व्यवस्थित निघत नाहीये, भांड्यावर स्टिकरचे डाग राहात आहेत, असं वाटत असेल तर पुन्हा एकदा काही सेकंदासाठी भांडे गरम करा.

 

२. दुसरा आणखी एक सोपा उपाय म्हणजे व्हिनेगर. हा उपाय करण्यासाठी जिथे स्टिकर लावलेले असेल त्या भागावर एक पेपर नॅपकिन टाका. पेपर नॅपकिनवर थोडे व्हिनेगर शिंपडा.

साडी नेसल्यावर दंड खूपच जाडजूड दिसतात? 'या' पद्धतीने ब्लाऊज शिवा- हात दिसतील सुडौल, देखणे

स्टिकर असलेल्या ठिकाणी व्हिनेगर व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या. यानंतर १० सेकंद पेपर नॅपकिन तसाच स्टिकरवर राहू द्या आणि त्यानंतर अलगदपणे स्टिकर ओढून काढा. यानंतर स्टिकर जिथे होते ती जागा व्हिनेगर लावून कापसाने पुसून घ्या. 


 

Web Title: how to remove stickers from new utensils, How to remove sticker glue from new utensils? 2 Ways to Remove Sticker from Stainless Steel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.