घरोघरी आरसे असतात. तसेच काचेचे दरवाजे, काचेच्या खिडक्या असतात. घरात एकच आरसा नसतो. खोलीतला आरसा वेगळा तसेच बाथरुममधील आरसा वेगळा आणि इतरही काही असतात. (how to remove Stains on the glass of windows and mirrors, 'This' solution can clean it in a minute, home remedies )त्यांच्यावर डाग, धूळ, बोटांचे ठसे, पाण्याचे शिंतोडे अशा साऱ्याचा सतत मारा होत असतो. यामुळे आरसे खराब होतात डागाळलेले दिसतात. बाथरूममधील बाष्प, स्वयंपाकघरातील तेलाचे डाग आणि लहान मुलांचे हात या सगळ्यांचा परिणाम काचेवर दिसतो. स्वच्छ आरसा नसेल, तर आरशात चेहरा नीट दिसत नाही, शिवाय घराच्या काचा स्वच्छ नसतील तर घरही जरा खराबच दिसते. म्हणूनच आरसे स्वच्छ ठेवणे आवश्यक असते.
आरसे स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक उपाय खूप प्रभावी ठरतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आरसा स्वच्छ करताना कोणतेही रखरखीत कापड किंवा खडबडीत वस्तू वापरू नयेत. त्यामुळे आरशावर ओरखडा पडू शकतात. कोमट पाण्यात थोडे व्हिनेगर मिसळून तयार केलेले मिश्रण हा एक आरसा स्वच्छ करण्यासाठीचा उत्तम उपाय आहे. यासाठी अर्धे पाणी आणि अर्धे व्हिनेगर एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरायचे. आरशावर फवारणी करून मायक्रोफायबर कापडाने किंवा जुन्या टी-शर्टच्या सॉफ्ट कापडाने हळूवारपणे पुसायचे.
बाथरूममधील आरसे स्वच्छ ठेवण्यासाठी दररोजच्या अंघोळी नंतर लगेच आरसा कोरडा पुसावा. त्यामुळे बाष्प जमा होऊन पाण्याचे डाग तयार होतात. अंघोळीनंतर लगेच पाणी साफ केल्यावर त्याचे डाग टाळता येतात. आरसा साबणामुळे खराब होतो. त्यासाठी लिंबाच्या रसात थोडे मीठ मिसळून आरशावर लावून थोडावेळ ठेवावे आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसावे. हा उपाय डागांसह बॅक्टेरिया दूर करण्यासाठीही उपयुक्त ठरतो.
घरातील लहान मुले जिथे खेळतात तिथल्या आरशांवर बोटांचे ठसे कायमच राहतात. हे टाळण्यासाठी आरशांच्या खालील भागावर कापड लावायचे. तसेच कागदाने पुसायचे. फक्त पाणी आणि काही घरगुती उपाय करुन तेथील जागा स्वच्छ करायची. कारण लहान मुलांना फवारणी किंवा इतर औषधांचा त्रास होऊ शकतो. काचा साफ करण्यासाठी बाजारात अनेक लिक्विड्स मिळतात. त्यातील चांगले निवडा. नैसर्गिक असेल तर उत्तम.