Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > न धुताही बुटांचा घाणेरडा वास जाईल पळून, ट्राय करा 'या' सोप्या घरगुती ट्रिक-बूट चकाचक

न धुताही बुटांचा घाणेरडा वास जाईल पळून, ट्राय करा 'या' सोप्या घरगुती ट्रिक-बूट चकाचक

Shoes Smell : सामान्यपणे लोक हाच विचार करतात की, शूजचा वास घालवण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे शूज धुणे. पण असं अजिबात नाहीये. शूज पुन्हा पुन्हा धुणं काही सोपं काम नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:26 IST2026-01-23T12:05:31+5:302026-01-23T15:26:37+5:30

Shoes Smell : सामान्यपणे लोक हाच विचार करतात की, शूजचा वास घालवण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे शूज धुणे. पण असं अजिबात नाहीये. शूज पुन्हा पुन्हा धुणं काही सोपं काम नाही.

How to remove shoe smell without washing it | न धुताही बुटांचा घाणेरडा वास जाईल पळून, ट्राय करा 'या' सोप्या घरगुती ट्रिक-बूट चकाचक

न धुताही बुटांचा घाणेरडा वास जाईल पळून, ट्राय करा 'या' सोप्या घरगुती ट्रिक-बूट चकाचक

Shoes Smell : घरातून बाहेर पडताना आपले शूज स्वच्छ असतात, पण जेव्हा आपण बाहेर जातो, पायी चालतो तेव्हा त्यांवर धूळ, घाण, चिखल चिकटतो. यामुळे शूज खराब तर होतातच, सोबतच त्यातून घाण वासही येऊ लागतो. शूजमधून घाण वास येणं ही समस्या सामान्य वाटू शकते. पण चारचौघात यामुळे लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो. खासकरून तेव्हा जेव्हा आपण ऑफिसमध्ये असता किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये जाता किंवा घरी पाहुणे आले असतील. या स्थितीत येणारा शूजचा वास फारच त्रासदायक होतो.

सामान्यपणे लोक हाच विचार करतात की, शूजचा वास घालवण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे शूज धुणे. पण असं अजिबात नाहीये. शूज पुन्हा पुन्हा धुणं काही सोपं काम नाही. हिवाळ्यात - पावसाळ्यात शूज लवकर वाळत नाही. तसेच शूज पुन्हा पुन्हा धुतल्याने त्यातील मटेरिअल तर खराब होतंच, सोबतच शूजची चमकही कमी होते. अात आम्ही आपल्याला अशा काही ट्रिक सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने आपण शूज न धुताही त्यांचा वास घालवू शकता.

शूजचा घाण वास घालण्याचे सोपे उपाय

बेकिंग पावडर

दिवसभर शूज पायांमध्ये राहत असल्याने त्यांमध्ये घाम येतो आणि बॅक्टेरिया जमा होतात. याच कारणाने शूजमधून वास येतो. अशात शूजचा घाण वास घालवण्यासाठी बेकिंग पावडरचा करू शकता. बेकिंग पावडर घाम आणि बॅक्टेरिया नष्ट करतात. त्यामुळे घाण वासही निघून जातो. यासाठी रात्री थोडं बेकिंग पावडर शूजमध्ये टाकून ठेवा आणि सकाळी शूज ब्रशने साफ करा.

टी - बॅग

बऱ्याच घरांमध्ये चहासाठी हल्ली टी-बॅगचा वापर केला जातो. टी-बॅग वापरून झाल्यावर ती फेकली जाते. पण ही वापरलेली टी - बॅग आपल्या कामात पडू शकते. वापरलेली टी-बॅग थंड झाल्यावर शूजमध्ये ठेवा. टी-बॅगमधील तत्व बॅक्टेरिया कमी करतात आणि घाण वासही दूर करतात. काही तासांसाठी टी-बॅग शूजमध्ये ठेवा, आपल्याला फरक दिसून येईल.

सॉक्स रोज बदला

बऱ्याच लोकांना सवय असते की, ते सॉक्सचा एकच जोड तीन ते चार दिवस वापरतात. त्यामुळे घाम आणि बॅक्टेरिया शूजमध्ये अधिक वाढतात. जर आपण रोज धुतलेले - स्वच्छ सॉक्स वापराल तर शूजमधून घाण वास येण्याची समस्या होणार नाही.

Web Title : बिना धोए जूतों की बदबू दूर करने के आसान घरेलू उपाय

Web Summary : बिना धोए जूतों की बदबू हटाएं! बेकिंग सोडा, इस्तेमाल किए हुए टी बैग और रोजाना मोजे बदलने से बैक्टीरिया और पसीने से मुकाबला होता है। ताज़ा महक वाले जूतों के लिए आसान घरेलू उपाय।

Web Title : Easy Home Tricks to Eliminate Shoe Odor Without Washing

Web Summary : Eliminate shoe odor without washing! Baking soda, used tea bags, and daily sock changes combat bacteria and sweat. Simple home tricks for fresh-smelling shoes.