प्रत्येकाच्या घरात थोडं का होईना पण लाकडी फर्निचर असतंच.. हल्ली तर घरोघरी खूप फर्निचर केलं जातं. ज्या घरात लहान मुलं असतील किंवा जिथे खूप काळजीपुर्वक फर्निचर हाताळल्या जात नसेल त्या घरामध्ये फर्निचवर काही वर्षांतच चरे किंवा स्क्रॅचेस दिसू लागतात. त्यामुळे मग नव्या असलेल्या लाकडी वस्तूही जुनाट दिसू लागतात. आता या चरे, ओरखडे पडून जुनाट दिसू लागलेल्या लाकडी वस्तू तुम्हाला जर अगदी नव्यासारख्या चमकवून टाकायच्या असतील तर हे काही सोपे उपाय घरच्याघरी करून पाहा..(simple tips and tricks to repair scratches from wooden furniture at home)
लाकडी फर्निचरवर स्क्रॅचेस, ओरखडे आल्यास उपाय
१. मेण
लाकडी फर्निचरवरील ओरखडे गायब करण्यासाठी मेण खूप उपयुक्त ठरते. हा उपाय करण्यासाठी एखादी मेणबत्ती घ्या आणि एखाद्या मिनिटासाठी ती जिथे स्क्रॅचेस दिसत आहेत त्या भागावर घासा.
गहू, डाळींमध्ये बारीक किडे, अळ्या दिसू लागल्या? लगेचच करा ४ उपाय- धान्य वर्षभर राहील स्वच्छ
त्यानंतर एखादा सुती कपडा घ्या आणि तो ही एखाद्या मिनिटासाठी तिथे घासा. असं केल्यानंतर ओरखडे नेमके कुठे आले होते, हे ही तुमच्या लक्षात येणार नाही.
२. खोडरबर
मुलांच्या दप्तरातील खोडरबर लाकडी वस्तूंवरील चरे काढून टाकण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. हा प्रयोग करण्यासाठी आकाराने थोडं मोठं असणारं खोडरबर घ्या जेणेकरून ते तुम्हाला घासायला सोपं जाईल.
किचनमधले नॅपकिन पिवळट, चिकट झाले? १ उपाय- तेलाचा वासही जाऊन नव्यासारखे स्वच्छ होतील
जिथे जिथे चरे पडलेले असतील तिथे तिथे २ ते ३ मिनिटांसाठी खोडरबर घासा. यानंतर एखादा मायक्रोफायबरचा कपडा घ्या. त्याला थोडी पेट्रोलियम जेली लावा आणि त्याने खोडरबर घासलेल्या जागी घासून काढा.चरे गायक होतील.