Join us

रोज वापरायची कढई काळीकुट्ट दिसतेय? चिमूटभर मीठ 'या' पद्धतीनं वापरा, कढई चकाकायला लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:27 IST

How To Remove Rust From Kadai : कढईला गंज लागणं, कढई काळी पडणं ही एक कॉमन समस्या आहे.

स्वंयपाकघरात वापरली जाणारी कढई सतत वापरून काळी पडते. अनेकदा गंज लागल्यामुळे खराब होते. यात स्वयंपाक बनवणं शक्य होत नाही अशा वेळी नवीन कढई घ्यावी लागते. (Cleaning Tips) कढईला गंज लागणं, कढई काळी पडणं ही एक कॉमन समस्या आहे. काही ट्रिक्स तुमचं कढई स्वच्छ करण्याचं किचकट काम अधिकच सोपं बनवतील. (How To Remove Rust From Kadai)

सोशल मीडियावर सध्याच्या स्थितीत काळी कढई काही मिनिटांत साफ करण्याची ट्रिक व्हायरल होत आहे. आजाद नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या ट्रिकने भांडी सहज स्वच्छ करता येतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार सामान लागणार नाही. टूथपेस्ट, बेकिंग सोडा, मीठ, व्हाईट व्हिनेगर हे पदार्थ कढई स्वच्छ करण्यासाठी लागतील. (How To Remove Rust From Kadai And Clean It Inside And Out By Using Salt And Vinegar)

कढई साफ करण्याच्या ट्रिक्स

एशियन जर्नल ऑफ रिसर्च इन फार्मास्युटिकल सायन्सच्या रिपोर्टनुसार मीठाचं पाणी हे डिस्इंफेक्टंटप्रमाणे काम करतं आणि भांडी स्वच्छ करते यामुळे बॅक्टेरियाज कमी होण्यासही मदत होते. सगळ्यात आधी गंज लागलेली कढई मोठ्या भांड्यात ठेवा. लक्षात ठेवा की भांडं इतकं मोठं असायला हवं की कढई साफ करणं सोपं जाईल. कढईला सगळ्यात आधी टुथपेस्ट लावा. त्यानंतर बेकींग सोडा, मीठ घाला. नंतर एसिडीक नेचरचं व्हाईट व्हिनेगर मिसळा यामुळे केमिकल रिएक्शन होईल.

कढई कशी साफ करावी?

जवळपास १० ते १५ मिनिटं कढईला ते द्रावण लावून ठेवा. या दरम्यान व्हिनेगरनं रिएक्शन झाल्यामुळे गंज आणि घाण निघू लागेल. जेव्हा गंज बाहेर निघेल तेव्हा कढईचा बाहेरील भाग स्वच्छ करा. नंतर स्क्रबरच्या मदतीनं रगडून कढई पुढे आणि मागच्या बाजूनं स्वच्छ करा. ही ट्रिक वापरून कढई काही मिनिटांतच साफ होईल.

मनी प्लांट धड वाढतच नाही? १ चमचा 'हा' पदार्थ कुंडीत घाला; भरगच्च पानांनी बहरेल वेल

 

या पद्धतीनं क्लिनिंग करू शकता

एका वाटीत सर्व पदार्थ मिसळून पेस्ट बनवून घ्या. नंतर ही पेस्ट गंज लागलेल्या कढईला लावून आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी स्वच्छ करा. १५ मिनिटं तसंच लावून ठेवा. ही पेस्ट गंज आणि घाण लगेच स्वच्छ करेल. स्क्रबरच्या मदतीनं कढई रगडून साफ करून घ्या.

क्लिनिंगनंतर हे काम करा

कढई  कोमट पाण्यानं धुवून घ्या. नंतर कढई स्वच्छ कापडानं पुसून घ्या. मॉईश्चर राहिल्यामुळे कढईला गंज लागू शकतो. याव्यतिरिक्त कढईला गंज लागू नये यासाठी ऑईल ग्रिसिंग करा. तेलाचं कोटींग असल्यास कढईल गंज लागत नाही.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स