Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात टॉवेलला येणारा कुबट वास घालविण्याचा सोपा उपाय! बघा टॉवेल किती दिवसांनी धुणं गरजेचं 

पावसाळ्यात टॉवेलला येणारा कुबट वास घालविण्याचा सोपा उपाय! बघा टॉवेल किती दिवसांनी धुणं गरजेचं 

Simple Tricks And Tips To Wash Towel: तुमचा रोजचा टॉवेल तुम्ही किती दिवसांनी धुता वाचा टॉवेलच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी..(how to remove odour or bad smell from towel?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 13:06 IST2025-07-10T13:05:28+5:302025-07-10T13:06:37+5:30

Simple Tricks And Tips To Wash Towel: तुमचा रोजचा टॉवेल तुम्ही किती दिवसांनी धुता वाचा टॉवेलच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी..(how to remove odour or bad smell from towel?)

how to remove odour or bad smell from towel, simple tricks and tips to wash towel | पावसाळ्यात टॉवेलला येणारा कुबट वास घालविण्याचा सोपा उपाय! बघा टॉवेल किती दिवसांनी धुणं गरजेचं 

पावसाळ्यात टॉवेलला येणारा कुबट वास घालविण्याचा सोपा उपाय! बघा टॉवेल किती दिवसांनी धुणं गरजेचं 

Highlightsटॉवेल धुताना त्यासाठी खूप जास्त वॉशिंग पावडर किंवा साबण वापरू नये. कारण त्यामुळे टॉवेल दिवसेंदिवस जास्त कडक होत जातो.

रोजच्या रोज शारिरीक स्वच्छतेसाठी ज्या काही वस्तू आपल्याला अतिशय गरजेच्या असतात अशा वस्तूंपैकी एक म्हणजे टॉवेल. आपला रोजचा टॉवेल स्वच्छ असणं गरजेचंच आहे. कारण तो जर अस्वच्छ असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकाराचं बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्यासाठी तो एक प्रमुख कारण ठरू शकताे. काही घरांमध्ये टॉवेल अगदी रोजच्या रोज धुतला जातो. तर काही घरांमध्ये ८- १० दिवस एकच टॉवेल वापरला जातो. ही दोन्ही उदाहरणं अगदी टोकाची आहेत (simple tricks and tips to wash towel). त्यामुळे यातला मधला मार्ग कोणता आणि टॉवेल किती दिवसांनी धुणं गरजेचं असतं ते बघा..(how to remove odour or bad smell from towel?)

 

तुम्ही तुमचा टॉवेल किती दिवसांनी धुता?

याबाबतीत असं सांगितलं जातं की आपला रोजचा टॉवेल दर दोन ते तीन दिवसांनी धुतला पाहिजे. याचाच अर्थ असा की साधारण २ ते ३ वेळा वापरून झाल्यानंतर टॉवेल लगेचच धुवायला टाकावा.

पावसाळ्यात केस धुतले तरी लगेच चिकट होतात? २ उपाय- शाम्पू न करताही केस होतील सिल्की 

टॉवेल धुताना त्यासाठी खूप जास्त वॉशिंग पावडर किंवा साबण वापरू नये. कारण त्यामुळे टॉवेल दिवसेंदिवस जास्त कडक होत जातो आणि मग असा टॉवेल काही दिवसांतच वापरणं बंद करून टाकावं लागतं.

एकदा घेतलेला टॉवेल वर्षांनुवर्षे वापरू नये. वर्षातून एकदा घरातले सगळे टॉवेल बदलायला हवे.

 

टॉवेलला येणारी दुर्गंधी कशी घालवायची?

जर तुम्हाला असं आढळून आलं की तुम्ही नेहमीच टॉवेल स्वच्छ धुत आहात पण तरीही त्या टॉवेलला कुबट वास येत आहे, तो वास केल्या केल्या जात नसेल आणि अगदी एकदा अंग पुसलं तरी टॉवेलचा कुबट वासच येत असेल तर तो टॉवेल बदलण्याची वेळ झाली आहे हे समजून घ्या.

भाजी, वरणात जास्त पाणी पडून अगदीच ढुळ्ळूक, पांचट झालं? १ ट्रिक- ग्रेव्ही, आमटी होईल घट्ट

पावसाळ्याच्या दिवसांत टाॅवेलला कुबट वास येण्याचं प्रमाण जरा वाढतं. हे टाळण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा घाला आणि त्यामध्ये काही वेळ टॉवेल भिजत घाला. त्यानंतर तो धुवून काढा. वास कमी होईल. 

 

Web Title: how to remove odour or bad smell from towel, simple tricks and tips to wash towel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.